Rajasthan Tourism: पधारो म्हारे देश म्हणणाऱ्या आणि गुलाबी सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजस्थानमधील पर्यटन वाढवण्याकडे कल आहे. त्याच अनुशंगाने राजस्थानात फिरण्यासाठी जास्तीत-जास्त पर्यटकांनी यावे यासाठी सरकार अनेक मोठे निर्णय घेण्याच्या आहे, डोमेस्टिक पर्यटनाला ही उत्तेजन देण्याचा सरकारचा कल आहे.
Minister Vishvendra Singh On Rajasthan Tourism: राजस्थान (Rajasthan) चे पर्यटन मंत्री विश्वेंद्र सिंह (Vishvendra Singh) यांनी सांगितले की कशा प्रकारे मागील २ वर्षात राजस्थानात पर्यटन क्षेत्रात खूप हानी झाली आहे आणि पर्यटन क्षेत्रात राजस्थानाला किती मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
विश्वेंद्र सिंह यांनी सांगितले की राजस्थान राज्य अनेक नवीन योजना आणणार आहे, ज्यामुळे देशातील आणि परदेशातील पर्यटक खूप मोठ्या संख्येने राजस्थान राज्याला भेट देतील.
पर्यटनाला इंडस्ट्री चे स्वरूप देण्याचा प्रयत्न
पर्यटन मंत्री विश्वेंद्र सिंह यांनी सांगितले की २०२० मध्ये राजस्थानात टूरिज्म पॉलिसी तयार करण्यात आली. माझ्याकडे नागरी विमान वाहतूक विभाग देखील आहे. आम्ही पर्यटनाला एक इंडस्ट्रीचा दर्जा प्रदान करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे लोन टॅक्स यामध्ये 50 टक्के कपात होते. हे कार्य १९८९ पासून प्रलंबित होते.
डोमेस्टिक पर्यटन राजस्थानात आणण्याचा प्रयत्न केला जाईल
त्यांनी सांगितले की मागील २ वर्षात राजस्थानात पर्यटन जवळ-जवळ संपुष्टात आलं आहे. याचे फक्त नुकसानच झाले नाही तर हे पूर्णपणे संपलेलेच आहे. आता आम्ही या प्रयत्नात आहोत की डोमेस्टिक पर्यटन राजस्थानात कशा प्रकारे आणले जाईल. राजस्थानात डोमेस्टिक टूरिज्म यावर अधिक फोकस करण्याची गरज आहे कारण परदेशातून पर्यटक मोठ्या प्रमाणात येण्यास अजून कमीतकमी १ वर्ष तरी लागेल.
'पॅलेस ऑन व्हिल्स' चे भाडे कमी होणार
राजस्थान राज्याचे पर्यटन मंत्री यांनी पैलेस ऑन व्हील्स चे भाडे कमी करण्याची घोषणा केली. पूर्वी हे भाडे डॉलर आणि युरो या चलनात घ्रेतले जात असे आणि ते साडे चार लाख इतके होते.पण आता आम्ही यात कपात करून दीड लाख रुपयांपर्यंत खाली आणणार आहोत. आमच्या साठी सामान्य पर्यटक खूप महत्त्वाचे आहेत. आम्ही Palace On Wheels सामान्य पर्यटकांचा आवाक्यात आणणार आहोत.
ते म्हणाले की रिलिजियस, कल्चरल, वाईल्डलाईफ आणि हेरीटेज या सर्व क्षेत्रांचा समावेश करून आम्ही नवीन सर्किट्सची निर्मिती करणार आहोत. राजस्थान राज्याने टूरिज्म साठी फिल्म पॉलिसी ची ही निर्मिती केली आहे. आम्ही बरेच रिबेट जाहीर केले आहेत. आम्ही लोकल जीएसटी न आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
पर्यटन मंत्र्यांनी सांगितले की पुढल्या वर्षी राजस्थानात निवडणूक होणार आहे. तेव्हा सारेच लोक त्या मनःस्थितीत असणार.म्हणून त्याआधीच आम्हाला राजस्थानात पर्यटन क्षेत्रात अनेक नव्या गोष्टी इम्प्लीमेंट करायचा आहेत.याचे कारण असे की आम्ही फक्त घोषणा करीत नाही. केंद्र सरकार कडून आम्हाला काहीच मदत मिळत नाहीये.
अनेक योजनांचा भार आमच्यावर टाकण्यात आला आहे. ते म्हणाले की मीडियाला आम्ही विनंती करतो की त्यांनी राजस्थानात टूरिज्मचा विकास करण्यात आमची मदत करावी. आमच्या अनेक योजना केंद्र सरकारमुळे अडकून पडल्याआहेत.
परदेशातून फक्त १० टक्के लोक पर्यटनासाठी येत आहेत, म्हणूनच आम्ही डोमेस्टिक टूरिज्म यावर अधिक लक्ष केंद्रित करणार आहोत. पर्यटन मंत्री विश्वेंद्र सिंह म्हणाले की भारतीय जनता पक्षाचे ६ मुख्यमंत्री उमेदवार आहेत.
राजस्थान राज्यात आम्ही खूप चांगले काम केलं आहे. आम आदमी पार्टीला अजून बराच वेळ लागणार आहे. लोकांना काम करणारे हवे असतात. केजरीवाल हे तिसऱ्यांदा सत्तेत आले कारण त्यांनी काम करून दाखवले आहे. म्हणून मी त्यांची स्तुती करतो.