धक्कादायक जेसीबीच्या टायर ट्युबमध्ये हवा भरताना मोठा स्फोट, दोघांच्या चिंधड्या

JCB Tyre Bursts: On Camera, JCB Tyre Bursts: एक धक्कादायक बातमी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना.  

Updated: May 5, 2022, 01:06 PM IST
धक्कादायक जेसीबीच्या टायर ट्युबमध्ये हवा भरताना मोठा स्फोट, दोघांच्या चिंधड्या title=

रांची : JCB Tyre Bursts: On Camera, JCB Tyre Bursts: एक धक्कादायक बातमी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना. छत्तीसगडमधून. जेसीबीच्या टायरमध्ये हवा भरताना दोघांचा मृत्यू झाला आहे. रायपूरमधील सिलतारा घनकुन स्टील्स प्राइवेट लिमिटेड या गॅरेजमध्ये ही दुर्घटना घडली आहे. हवा भरताना जेसीबीच्या टायर ट्युबचा स्फोट झाला. 

हा स्फोट इतका भीषण होता की हवा भरणारे दोन्ही कारागीर हवेत उंच फेकले गेले. यातील एकाच्या तर चिंधड्या झाल्या. तर दुस-याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही भीषण दुर्घना गॅरेजच्या सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. राजपाल आणि प्रांजन अशी मृत कारागीरांची नावं असून दोघेही मुळचे मध्यप्रदेशातील आहेत. शवविच्छेदनानंतर त्यांचे मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आलेत.

सिलतारा येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना सीसीटीव्हीत चित्रीत झाली. हवा भरताना जेसीबीचा टायर फुटला. या अपघातात तेथे उपस्थित असलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. राजपाल आणि प्रांजन अशी मृत कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हा स्फोट इतका भीषण होता की टायरजवळील दोन्ही कामगारांनी हवेत फेकले गेलेत. यासोबतच त्यांच्या शरीराचे काही तुकडेही आजूबाजूला विखुरले होते. त्याचवेळी जेसीबीचा टायर दूरवर पडला. 

या प्रकरणाबाबत सिलतारा चौकीचे प्रभारी राजेश जान पाल यांनी सांगितले की, राजपाल सिंह (32) वडील रामदिन सिंग आणि प्रंजन नामदेव (32) वडील राजभान नामदेव, राहते गाव खमहरिया, येथील घनकुन स्टील्स प्रायव्हेट लिमिटेडच्या गॅरेजमध्ये काम करत होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास दोघेही जेसीबीच्या टायर ट्युबमध्ये हवा भरत होते. यादरम्यान अचानक टायरचा मोठा आवाज झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.