मुंबई : दुकान, घर किंवा मग कोणाचं ऑफीस असो... अनेक जण कोणाची नजर लागू नये म्हणून मुख्य दारावर लिंबू-मिर्ची लावतात. पण हा आता एक मोठा व्यवसाय झाला आहे. यामधून लाखो लोकांना रोजगार मिळत आहे.
लिंबू-मिर्चीच्या या धंद्यामुळे 57 लाख लोकांना यातून रोजगार मिळाला आहे. वर्षाला लिंबू-मिर्चीच्या या धंद्यात एकूण 36 हजार कोटींची उलाढाल होते. याचं मुख्य कारण म्हणजे याचा वापर सरकारी-गैर सरकारी संस्था, बँक, रुग्णालय, अस्पताल, दुकान, मॉल, शोरूम, फेरीवाले सगळेच करतात. अनेक जण दुकान, घर किंवा त्यांच्या उद्योगाला नजर लागू नये म्हणून लिंबू-मिर्चीचा वापर करतात. शनिवारी किंवा मंगळवारी मोठ्या प्रमाणात याचा वापर होतो.
एका लिंबू-मिर्चीची किंमत 5 ते 10 रुपये असते. अनेक शहरांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. दिल्लीतील कंफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने केलेल्या या सर्वेत असं म्हटलं आहे की, लिंबू-मिर्ची ही जवळपास पाऊने आठ लाख दुकानांवर लावली जाते. रोज 5166 व्यक्ती या धंद्यात असतात.
कोणताही व्यक्ती या धंद्यात येऊ शकतो. मग तो कोणत्याही धर्माचा असो किंवा जातीचा असो. काही लोकं इतरांना बघून देखील लिंबू-मिर्ची आपल्या दारावर लावायला सुरुवात करतात.
लिंबू-मिर्ची का लावतात याचं उत्तर अनेकांना कदाचित माहित देखील नसेल. पण मानसिकरित्या या मागचं कारण असं असू शकतं की, जेव्हा कोणतीही व्यक्ती आंबट वस्तू लिंबू, चिंच या सारख्या गोष्टी पाहतात तर यामुळे त्या व्यक्तीचं इतर गोष्टींवरुन मन विचलित होतं. दुकानदारांचं असं म्हणणं आहे की, यामुळे त्यांच्या दुकानावर कोणाची वाईट नजर पडत नाही. अनेकांची अशी मान्यता आहे की. लिंबू नकारात्मक ऊर्जा कमी करतो. यामुळे वातावरण सकारात्मक राहतं. ज्या घरात लिंबूचं झाड असतं त्या घरात नकारात्मकता येत नाही अशी देखील काही लोकांनी मान्यता आहे.