मुख्यमंत्र्यांनी जी शपथ घेतली...एकनाथ शिंदेंबद्दल काय म्हणाले अजित पवार?

Maratha Reservation:  महायुतीचे सरकार अशाच पद्धतीचे धडाडीचे निर्णय घेत असल्याचे पवार म्हणाले.

Pravin Dabholkar | Updated: Jan 27, 2024, 02:51 PM IST
मुख्यमंत्र्यांनी जी शपथ घेतली...एकनाथ शिंदेंबद्दल काय म्हणाले अजित पवार? title=

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यासंदर्भातील जीआरची प्रत जरांगेच्या हाती सुपूर्द केल्यानंतर मराठा बांधवांनी एकच जल्लोष केला. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची स्तुती केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाला हात लावून समस्त लाखो मराठा जणांच्या समोर मराठा आरक्षण देण्याची शपथ घेतली होती. ती शपथ मुख्यमंत्र्यांनी खरी करून दाखवली त्याचा सार्थ अभिमान असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. 

साताऱ्यातील औंध येथील एका कार्यक्रमादरम्यान अजित पवार बोलत होते. महायुतीचे सरकार अशाच पद्धतीचे धडाडीचे निर्णय घेत असल्याचे पवार म्हणाले. आगामी काळात देखील असेच निर्णय हे सरकार घेत राहील असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला. 

गुन्हे मागे घेणार- फडणवीस

सरकारने सकारात्मकता दाखवल्याचा मला आनंद असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यांनी यावेळी मनोज जरांगे यांचं अभिनदं केले. मार्ग कायदेशीर काढावा लागेल असे आम्ही सांगत होतो. नोंदी असलेल्या रक्त नात्यातील लोकांना प्रमाणपत्र देता येईल. सरकारने मार्ग स्वीकारला आहे आता मराठा समजाचा प्रश्न सुटणार असल्याचे फडणवीस म्हणाले. 

ओबीसवर अन्याय होऊ दिला नाही. राज्यातील सर्व समजणं न्याय देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत भुजबळांच्या नाराजीवरदेखील त्यांनी भाष्य केले. कायदेशीर अडचण होती ती दूर करून कार्यपद्धती सोपी केली, भुजबळ साहेबांचं समाधान होईल, असे ते म्हणाले. मराठा मोठा समाज असून सर्वेक्षण सुरु आहे. क्युरेटिव्हमध्ये सकारात्मक मार्ग निघेल, तरी सर्वेक्षण सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

गुन्हे मागे घेण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार गुन्हे मागे घेतले जातील. असे असले तरी घर जाळणे, थेट हल्ला, हे गुन्हे कोर्ट आदेश शिवाय मागे घेता येणार नाही. इतर आंदोलन गुन्हे मागे घेणार असल्याचे फडणवीस म्हणाले.