नवी दिल्ली : भारताच्या हिंद महासागरात भारत आणि चीनमध्ये तणाव वाढत असतांना भारत आणि व्हिएतनाम यांच्यात अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर करार झाला. व्हिएतनामचे उपपंतप्रधान फा बिन मिन्ह आणि भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यात भेटीनंतर हे करार आहे. आजपासून दिल्ली 9 व्या भारत-आसियान यांच्यात मंत्री स्तरीय संवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिषदेत व्हिएतनामचे उपपंतप्रधान बिन मिन्ह आणि सिंगापूर संरक्षण आणि परराष्ट्र राज्यमंत्री मलिकी बिन उस्मान आणि अनेक नेते सहभागी झाले होते.
भारत आणि व्हिएतनाम यांच्यात करार त्या वेळी झाले जेव्हा भारत सोबत व्हिएतनाम देखील चीनच्या व्यवहारचातुर्याला कंटाळला आहे. हिंद महासागरात चीनच्या दादागिरीमुळे व्हिएतनामसह अनेक देश याला कंटाळले आहेत. पण भारत-व्हिएतनाम यांच्यातील वाढत्या संबंधामुळे चीनचं पोट दुखू शकतं.