पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर गोवा विधानसभेत अर्थसंकल्प सादर करीत आहेत.
स्वादुपिंडाच्या आजारामुळे पर्रिकर गेल्या १५ तारखेपासून मुंबईतल्या बांद्रा भागातील लीलावती रुग्णालयात उपचार घेत होते. आज सकाळी दहाच्या सुमारास पर्रिकरांना रुग्णालयातून घरी जाण्याची डॉक्टरांनी परवानगी दिली.
CM of Goa #ManoharParrikar presents budget in the State Assembly. pic.twitter.com/FjEWSBQkIT
— ANI (@ANI) February 22, 2018
गोवा विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. १५ तारखेला त्यांना पोटाचा त्रास सुरू झाल्यावर लीलावतीमध्ये दाखल करण्यात आलं. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
कालपासून त्याच्या प्रकृतीमध्ये झालेल्या प्रगतीनंतर त्यांना आज गोव्याला जाण्याची परवानागी देण्यात आली. आता त्यांची प्रकृती स्थिर असली, तरी उपचारासाठी त्यांना पुन्हा एकदा मुंबईला यावं लागणार आहे.
लीलावती हॉस्पीटलमध्ये उपचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती व्यकय्या नायडूदेखील त्यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले होते, असे कयासही बांधले जात आहेत.