नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात' या कार्यक्रमातून २६/११तील शहिदांना आदरांजली वाहिलीय.
दहशतवादाची पाळंमुळं नष्ट करायची असतील, तर मानवतावादी देशांना एकत्र येण्याची गरज असल्याचंही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
२६/११ हल्ल्यातील पीडितांना श्रद्धांजली वाहत दहशतवादांना कंठस्नान घालताना वीरमरण पत्करलेल्या जवानांना मोदींनी नमन केलं.
केवळ भारतच नव्हे तर जगातील सर्व मानवतावादी शक्तींनी एकत्र येऊन दहशतवादाला पराभूत करावे लागेल असंही नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'मध्ये संविधान दिनाचाही उल्लेख केला. २६/११ हा संविधान दिवस आहे. पण हा देश नऊ वर्षांपूर्वी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला कधीच विसरू शकत नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं.