Man use pistol to control traffic in Punjab Amritsar: पंजाब सरकार (Punjab Government) आणि पोलीस प्रशासन गन कल्चरला (Punjab Gun Culture) संपवण्यासाठी प्रयत्न करत आहे. सरकार आणि पोलिसांकडून यासंदर्भातील बरेच प्रयत्न केले जात आहे. मात्र पंजाबच्या लोकांमध्ये हत्यारांसंदर्भात असलेली क्रेझ वेगवेगळ्या घटनांमधून वारंवारसमोर येत असते. अमृतसरमधील पुतलीघरमध्ये गन कल्चरचं असं एक प्रकरण समोर आलं आहे. या घटनेमध्ये एक व्यक्ती ट्रॅफिकमध्ये अडला. लोक वेड्यावाकड्या पद्धतीने गाड्या चालवत असल्याने या व्यक्तीचा संयम सुटला आणि त्याने वाहतूककोंडी सोडवण्यासाठी थेट आपल्या खिशामधून रिव्हॉलव्हर काढली आणि ट्रफिक जाम झालेल्या दिशेला दाखवली. या व्यक्तीने रिव्हॉलव्हल काढून गाड्यांच्या दिशेने दाखवल्यानंतर एकच गोंधळ उडाला आणि आपला जीव वाचवण्यासाठी अनेकांनी गाड्या रत्याच्या बाजूला घेतल्या. काही सेकंदांमध्ये रस्त्यावरील गर्दी बाजूला सरली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
शुक्रवारी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पोलीस अधिकाऱ्यांना गन कल्चरलला चालना देणाऱ्यांविरोधात कारवाई अधिक तिव्र करण्याचं आवाहन केलं असतानाच ही घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली. राज्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी हत्यारं वापरणाऱ्यांविरोधात आतापर्यंत 167 जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. राज्यामध्ये एकूण 4.38 लाखांपैकी 1.77 लाख हत्यारं कोणाकडे आहेत याची माहिती गोळा करण्यात आली आहे, असंही मुख्यमंत्री मान म्हणाले. मात्र असं असतानाही राज्यामध्ये गन शो ऑफच्या घटना वाढत आहेत.
पंजाब सरकारने मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये सरकारने गन कल्चर आणि हिंसेला चालना देणारी हत्यारं वापरण्यावर बंधनं घातली होती. एका अधिकृत आदेशानुसार राज्य सरकारने लायसन्स समीक्षा केल्यानंतर हा आदेश दिला होता. या आदेशामध्ये हत्यारं सार्वजनिक पद्धतीने वापरण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही अनेकदा असे प्रकार घडताना दिसत आहेत. अशातच आता अमृतसरमधील हा व्हिडीओ समोर आला आहे.
Sengh Stucked In Traffic, Waived Pistol In Air To Clear The Traffic Jam.
Things You See In Punjab Only.
— ਹਤਿੰਦਰ ਸਿੰਘ (@Hatindersinghr3) February 6, 2023
राज्य सरकारनं सार्वजनिक कार्यक्रम, धार्मिक स्थळ, विवाह समारंभांबरोबरच अन्य कार्यक्रमामध्ये हत्यारं घेऊन जाण्यावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. भगवंत मान सरकार सातत्याने गन कल्चर संपवण्यावर भर देत आहे. मात्र असं असतानाही यासंदर्भातील बातम्या वारंवार पंजाबमधील वेगवेगळ्या भागांमधून समोर येत असतात.