धक्कादायक! सेक्सला नकार दिल्याने पत्नीची पतीकडून हत्या

पत्नीने सेक्स करण्यास नकार दिल्याने हरियाणामध्ये एक तरूण इतका संतापला की, त्याने पत्नीची हत्या केली. पोलिसांनुसार, हरियाणाच्या कुरूक्षेत्रमध्ये ही धक्कादायक घटना घडली.

Updated: Nov 17, 2017, 10:12 AM IST
धक्कादायक! सेक्सला नकार दिल्याने पत्नीची पतीकडून हत्या title=

चंडीगड : पत्नीने सेक्स करण्यास नकार दिल्याने हरियाणामध्ये एक तरूण इतका संतापला की, त्याने पत्नीची हत्या केली. पोलिसांनुसार, हरियाणाच्या कुरूक्षेत्रमध्ये ही धक्कादायक घटना घडली.

खेरा गावातील ३५ वर्षीय संजीव कुमार असे आरोपीचे नाव आहे. पतीच्या जबरदस्तीला विरोध केल्याने त्याने तिची हत्या केली.

संजीव कुमार विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मंगळवारी रात्री वैवाहिक अधिकारांवरुन वाद झाल्यावर संजीवने ३० वर्षीय सुमनची हत्या केली. दोघांच्या लग्नाला १० वर्ष झाले होते आणि त्यांना दोन मुलंही आहेत. आरोपी हा व्यवसायाने पेंटर आहे आणि त्याच्या परिवारातील सहा सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

पोलीस अधिका-यांनी सांगितले की, ‘चौकशी दरम्यान संजीवने मान्य केले की, त्याला सुमनसोबत सेक्स करायचा होता, पण सुमनने विरोध केला. संजीवला याचा राग आला आणि त्याने जबरदस्तीचा प्रयत्न केला. याच वादात त्याने पत्नीची हत्या केली’.

पत्नीची तब्येत चांगली नव्हती म्हणून तिने विरोध केल्याचे संजीवने सांगितले. तिच्या हेल्थ रिपोर्टमध्ये डेंग्य़ू झाल्याचं समोर आलं होतं.