CCTV Viral Video: कधी कोणी मृत्यू पाहिलाय का? कोणत्याही क्षणी कोणासोबत काय होईल सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार मेरठमधून समोर आला आहे. मेरठमध्ये (Merath) रस्त्याने चालत असताना एका तरुणाला शिंका आल्याने त्याचा जागीच मृत्यू (Man died after sneezed) झाल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (viral video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Man died after sneezed and fell on the road watch live video of death merath marathi news)
तरुणासोबत फिरणाऱ्या मित्रांनाही आपल्या मित्राला काय झालं हे समजू शकले नाही. मृत्यूची संपूर्ण (live video of death) घटना रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की एक रस्ता आहे, रात्रीची वेळी 4 मित्र एकत्र फिरत आहेत. थंडीचे दिवस असल्याने सर्वजण स्वेटर घालून फिरताना दिसत आहेत. तेवढ्यात...
आणखी वाचा - मेट्रोतल्या तरुणाच्या 'या' कृतीचे नैटकऱ्यांकडून जोरदार कौतुक; Photo होतोय व्हायरल
चार मित्रापैंकी एकाला जात असताना शिंक येते. त्यानंतर त्याला गळ्यात काहीतरी जाणवू लागलं. त्यावेळी तो स्वत:चा गळा धरतो. तेवढ्यात तो जात असताना अचानक जमिनीवर कोसळतो. अचानक शिंक येताच तरुणाला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला, त्यानंतर तो थेट जमिनीवर कोसळला. मित्र पडल्याचं पाहून मित्रांना देखील काही कळेना. त्यांनी मित्राला उठवण्याचा प्रयत्न केला.
छींक आई और वो मर गया...सीसीटीवी में क़ैद हुई लाइव मौत #ViralVideo pic.twitter.com/KOcDIKXaoz
— Zee News (@ZeeNews) December 4, 2022
दरम्यान, यानंतर तिन्ही मित्रांनी मिळून तरुणाला उचलून घरी नेणार होते. मात्र, त्यांनी प्लॅन बदलला आणि तिन्ही तरुणांनी आपल्या मित्राला आपल्या मांडीत उचलून बाईकवरून तातडीने रुग्णालयात (Hospital) नेलं. तरुणाला डॉक्टरांकडं नेलं असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. डॉक्टरांच्या माहितीनंतर मित्रांना धक्काच बसलाय. ही घटना किडवाई नगरातील गल्ली क्रमांक 3 मधील असल्याची माहिती मिळाली आहे.