कोलकाता : लोकसभा निवडणुकीत झालेल्या भाजपच्या दणदणीत विजयाचे पडसाद आता देशभरात उमटू लागले आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला, पण काँग्रेसच्या कार्यकारिणीने हा राजीनामा स्वीकारला नाही. यानंतर लगेचच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव दिला आहे.
तृणमूल काँग्रेसच्या संसदीय पक्षाची आज बैठक झाली. त्यामध्ये ममता बॅनर्जींनी राजीनाम्याचा प्रस्ताव दिला. तृणमूलच्या पक्षाध्यक्षपदी आपण कायम राहू पण मुख्यमंत्रीपदी राहायची इच्छा नसल्याचं ममता म्हणाल्या. केंद्रीय सुरक्षा दलांनी तृणमूलविरोधात कट आखला. पश्चिम बंगालमध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण केली, हिंदू मुस्लीम संघर्ष पेटवला, असा आरोप ममता बॅनर्जींनी केला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला २२ तर भाजपाला १८ जागा मिळाल्य. २०१४ मध्ये भाजपाला पश्चिम बंगालमध्ये फक्त १ जागा मिळाली होती.