विजयाच्या हॅटट्रिकनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे मोठे विधान, भाजपवर जोरदार हल्लाबोल

पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालानंतर (West Bengal Assembly Election 2021) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मोठे विधान केले आहे. 

Updated: May 3, 2021, 07:46 AM IST
विजयाच्या हॅटट्रिकनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे मोठे विधान, भाजपवर जोरदार हल्लाबोल title=
Pic / PTI

मुंबई : पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालानंतर (West Bengal Assembly Election 2021) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मोठे विधान केले आहे. त्याचवेळी त्यांनी भाजपवर विजयानंतर जोरदार हल्लाबोल केला आहे. 200 पेक्षा जास्त जागा जिंगल्या आहेत. आता भाजप आपले तोंड दाखवू शकेल काय, असा सवाल केला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीका करताना म्हटले आहे की, तृणमूल कॉंग्रेसने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत जातीय सलोखा टिकवून ठेवण्यासाठी केलेला लढा आहे. हा मिळालेला विजय त्याचेच प्रतिक आहे. 

नंदीग्राम निकालावरही   ममता बॅनर्जी यांनी भाष्य केले आहे. आमचा पक्ष तृणमूल कॉंग्रेसने (TMC) पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये नंदीग्रामच्या मतांची त्वरित फेर मतमोजणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. बॅनर्जी यांना नंदीग्राम जागेत पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपच्या शुभेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी त्यांचा फेरमतमोजणीत 1736 मतांनी पराभव केला.

‘Double Engine’ वर हल्ला

ममता बॅनर्जी यांनीही भाजपवर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, भाजपने डबल इंजिन सरकारचे (Double Engine) आश्वासन दिले होते. आम्ही एकूण 294 जागांपैकी 221 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते आणि जवळजवळ गाठले आहे. सुमारे दोन महिन्यांनंतर उभे राहून बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "देशाचे रक्षण आणि जातीय सलोख्याबद्दल मी जनतेचे आभार मानते." मला बंगालचा अभिमान आहे. हा एक मोठा विजय आहे, यावर कोणीही काही बोलू शकत नाही. त्यांनी (भाजप) 200 जागा जिंकण्याचा दावा केला होता. यानंतर ते आपला चेहरा दाखवू शकतील का? '

'आशा आहे भाजप सर्वत्र हरणार आहे'

मुख्यमंत्री पुढे म्हणाल्या की, सर्वत्र भाजपला असाच पराभवाचा सामना करावा लागेल. येथे येऊन आमच्या विरोधात प्रचार करणार्‍या केंद्रीय नेत्यांना विनम्र अभिवादन असेही त्या म्हणाल्या. जे इतर ठिकाणाहून आले आणि त्यांनी आमच्या विरोधात प्रचार केला. तरीही बंगालच्या जनतेने त्यांना नाकारले आहे. ममता बॅनर्जी नंदीग्रामच्या निकालासंदर्भात न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 'माझ्या मते माझ्या विजयाच्या बातमीनंतर काहीतरी चूक झाली आहे. यानंतर ऐकले की निकाल बदलला आहे. मी या विषयावर न्यायालयात जाणार आहे.

शपथविधी होणार नाही

शपथविधी सोहळा होणार नसल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. विधानसभेचे अधिवेशन केव्हा बोलले जाईल याचा निर्णय घेतला जाईल. कोरोनाच्या स्थितीवर त्या म्हणाल्या की,आम्ही कोरोनाचे वादळ हाताळू. मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या निकालाबद्दल आनंद व्यक्त केला आणि म्हणाल्या की, आज माझ्यासारखा कोणीही आनंदित होणार नाही, मला इतक्या जागा मिळतील असा विचार मी करू शकत नाही. ममता यांनी लोकांना विजयात्रा न काढण्याचे आवाहन केले आहे.