आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, 1 लीटरसाठी मोजावे लागतील 'इतके' रुपये

Petrol-Diesel Price : आज महाराष्ट्र दिनी (Maharashtra Day 2023) तुम्ही जर बाहेर फिरण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण आज पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: May 1, 2023, 08:42 AM IST
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, 1 लीटरसाठी मोजावे लागतील 'इतके' रुपये title=
Petrol-Diesel Price on 1 May 2023

Petrol-Diesel Price on 1 May 2023 : जय जय महाराष्ट्र माझा, या जयघोषात आज सर्वत्र महाराष्ट्र दिन (Maharashtra Day 2023) साजरा होणार आहे. महाराष्ट्र दिननिमित्त सार्वजनिक सुट्टी असते. तुम्हीपण जर या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बदल होऊन तब्बल एक वर्ष पूर्ण झाले आहे. कच्चा तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असतात. याचा फटका पेट्रोल-डिझेलच्या दरावर दिसून येतो. जाणून घेऊया पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel Price) आजचे लेटेस्ट दर...

महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक फ्युएल प्राइसिंग सिस्टमवर आधारित असतात. त्यानुसार दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलचे दर जाहिर केले जातात. यामध्ये यूएस डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी इ. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतीय इंधनाच्या किमती वाढतात. तर दुसरीकडे वर्षभरापासून म्हणजेच मे 2022 पासून कच्च्या तेलाची किमतीत अस्थिरता पाहायला मिळत आहे. आज पुन्हा एकदा प्रति बॅरल $80 च्या खाली घसरला असून बेंचमार्क ब्रेंट $79.82 प्रति बॅरल आणि डब्ल्यूटीआय क्रूड 0.72 टक्क्यांनी घसरून $76.23 प्रति बॅरलवर आला आहे. परिणामी राजधानी दिल्लीत (Delhi Petrol Rate) पेट्रोल 96.721 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर असणार आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर, तेच चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत (Mumbai Petrol Rate) पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरने विकले जाणार आहे. 

महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे दर 

शहर  पेट्रोल (प्रति लिटर)  डिझेल (प्रति लिटर)
अमरावती  107.14        93.65
कोल्हापूर  106.55        93.08 
मुंबई   106.31  94.27
नागपूर  106.06  92.61
नाशिक  106.77  93.27
पालघर  106.06  92.55
परभणी  109.47  95.86
पुणे  105.96  92.48
रायगड  105.97  92.47
रत्नागिरी  107.43  93.87
सांगली  106.56  93.09
सातारा  107.15  93.63
सिंधुदुर्ग  108.01  94.48
सोलापूर  106.20  92.74
ठाणे  105.97  92.47

SMS  द्वारे दर जाणून घ्या आजचे दर

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दररोजचे दर तुम्ही SMS द्वारे देखील मिळवू शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> 9224992249 वर पाठवू शकतात किंवा HPCL ग्राहक 9222201122 किंवा नंबरवर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक RSP<डीलर कोड> 9223112222 वर किंवा नंबरवर पाठवू शकतात. अशाप्रकारे तुम्हाला घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर समजतील.