नवी दिल्ली : भाविकांच्या श्रद्धेवर कोरोनाचं सावट आलेलं पाहायला मिळतंय. महाकुंभ शाही स्नानावर देखील कोरोनाने अडसर आणलाय. शाही स्नानाच्या आधी साधु संताची सर्वोच्च संस्था अखिल भारतीय आखाडा परीषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्यासहित अनेक संत कोरोना पॉझिटीव्ह आल्याने खळबळ माजली आहे.
कुंभनगरीमध्ये निरंजनी आखाड्यातील 1 आणि जूना अखाड्यातील 2 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. आतापर्यंत दोन्ही आखाड्यांचे 9 संत कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. रविवारी झालेल्या तपासणी अहवालात रविवारी आलेल्या अहवालात कोरोना झालेल्या वृत्ताला दुजोरा मिळाल्याने अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली.
आयसोलेशनमध्ये असलेले महंत नरेंद्र गिरी कोरोना पॉझिटीव्ह असून देखील उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांना महंत नरेंद्र गिरी यांना भेटण्यास कुणीही रोखले नाही. महंत नरेंद्र गिरी यांना शनिवारी रात्री उशिरा प्रकृती बिघडल्यानंतर हरिद्वार येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर दंडाधिकारी दीपक रावत आणि वरिष्ठ पोलिस अधीक्षक जन्मेजय खंडूरी यांनी तिथे जाऊन भेट त्यांची घेतली.
महाकुंभात, पुढचे तीन दिवस सातत्याने विशेष स्नानासाठी ब्रह्मकुंड येथे गंगेमध्ये भक्तांना उतरता येणार नाही. आज 12 एप्रिल रोजी सोमवती अमावस्येचे दुसरे शाही स्नान आहे. उद्या 13 एप्रिलला नव संवत्सरचे स्नान आहे. 14 एप्रिलला बैसाखीचे तिसरे शाही स्नान आहे. ज्यामध्ये 13 अखाड्याशी संबंधित संत स्नान करतात.
यावेळी भाविकांना हर की पडी, ब्रह्मकुंड आणि जवळील घाटांवर स्नान करणे शक्य होणार नाही. कारण ते साधु संतांसाठी राखीव आहे. निलाधार आणि इतर घाट सर्वसामान्यांसाठी खुले असतील अशी माहिती देण्यात आली.