धक्कादायक : जुगारात पत्नीला गमावले पतीने, जिंकणाऱ्याने केला गँगरेप

  पतीने जुगारात तिला गमावले आणि जो व्यक्ती जिंकला त्याने सामूहिक बलात्कार केला असा खळबळजनक आरोप मध्यप्रदेशातील इंदूर जिह्यातील ३८ वर्षीय महिलेने आपल्या पतीवर  लावला आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 12, 2017, 04:17 PM IST
 धक्कादायक :  जुगारात पत्नीला गमावले पतीने, जिंकणाऱ्याने केला गँगरेप title=

इंदूर :   पतीने जुगारात तिला गमावले आणि जो व्यक्ती जिंकला त्याने सामूहिक बलात्कार केला असा खळबळजनक आरोप मध्यप्रदेशातील इंदूर जिह्यातील ३८ वर्षीय महिलेने आपल्या पतीवर  लावला आहे.

महिला पोलीस ठाण्याची प्रभारी ज्योती शर्मा यांनी बुधवारी मीडियाला दिलेल्या माहितीत सांगितले की, महिलेने केलेल्या आरोपांसंदर्भात सर्व पक्षांचे औपचारीक जबाब घेतले आहे. सध्या या प्रकरणांच्या तथ्याची तपासणी झाली नाही, त्यामुळे महिलेच्या तक्रारीवरून कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. 

पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांनी सांगितले की, काल जनसुनावणी दरम्यान या महिलेने आपला पती किशोर यावर आरोप लावला की काही दिवसांपूर्वी त्याने जुगार खेळताना मला डावावर लावले. त्यात तो हरला मग जिंकणाऱ्या नौशाद आणि घनश्याम यांनी माझ्यावर सामुहिक बलात्कार केला. 

या घटनेनंतर ती आपल्या पतीपासून वेगळी राहत आहे. आता जुगारात जिंकलेल्या दोन व्यक्ती तिला त्रास देत आहेत.