Fake Account : ऑनलाईन फसवणुकीची (Online Fraud) तुम्ही अनेक उदाहरणे पाहिली असतील. फेसबुकवरही (Facebook) फेक अकाउंट तयार करुन फसवणूक केल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. पण एका पत्नीने आपल्या पतीला धडा शिकवण्यासाठी चांगलीच शक्कल लढवली होती. फेक अकाउंटवरुन (Fake Account) पतीच्या उचापात्या या महिलेने समोर आणल्या आहेत. मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) एका महिलेने आपल्या पतीचे सत्य समोर आणण्यासाठी फेसबुकवर फेक अकाउंट काढले होते. या महिलेने फेसबुकवर 'एंजल शर्मा' (angel sharma) नावाने अकाउंट सुरु केले होते. त्यानंतर पत्नीने पतीला फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवत फेसबुक फ्रेंन्ड बनवले. नवऱ्याची हकीकत जाणून घेण्यासाठी पत्नीने फेसबुकवर नाव बदलून त्याच्याशी बोलायला सुरुवात केली.
चारित्र्यावर सुरुवातीपासून संशय
"माझा पती मला सोडून नागपूरला निघून गेला होता. मी फेसबुकवर फेक आयडीद्वारे त्याच्यासोबत बोलत होते. मला त्याच्या चारित्र्यावर संशय होता. या अकाउंटवर मला त्याने भरपूर अश्लील फोटो पाठवले. यामध्ये त्याच्या खासगी भागांचेही फोटो होते. हे खूप किळसवाणे होते," असे या महिलेने सांगितले आहे.
औषध घेऊन शारिरीक शोषण
"19 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या पतीसोबत 2007 मध्ये माझा विवाह झाला होता. मी हे लग्न टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत होते. मला एक 12 वर्षांचा मुलगा देखील आहे. पण सुरुवातीपासून पतीची वागणूक अशीच होती. तो औषध घेऊन माझे शोषण करायचे. मला शारीरिक पातळीवर खूप समस्या येऊ लागल्या. यामुळे मी विरोध केला. त्यानंतर तो मुलाला सोडून पळून गेला," असेही पत्नीने म्हटलं आहे.
महिलेने कौटुंबिक न्यायालयात याबाबत तक्रारही केली होती. पण सुनावणीच्या वेळी तो यायचा नाही असे या महिलेने सांगितले. पती नागपूर विमानतळावर विमानतळावर कामाला असून तक्रार करुनही कोणतीही मदत करण्यात आलेली नाही. त्यामुळे घटस्फोटही होऊ शकलेला नाही, असे ही महिला म्हणाली.
दरम्यान, पती इतर महिलांसोबतही संपर्कात होता असा आरोप पत्नीने केला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर तपास सुरु केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.