बँकेत नोकरी करायचीये? घसघशीत पगाराची 'ही' संधी गमावू नका

Bank News : हल्लीच्या तरुणाईचा नोकरीकडे (jobs) असणारा एकंदर कल प्रचंड बदलताना दिसत आहे. तुम्हीही अशाच एखाद्या नोकरीच्या शोधात आहात का? मग ही संधी तुमच्यासाठीच आहे असं समजा... 

Updated: Dec 1, 2022, 03:35 PM IST
बँकेत नोकरी करायचीये? घसघशीत पगाराची 'ही' संधी गमावू नका  title=
bank jobs ibps programming assistant recruitment 2022 latest marathi news

Bank News : हल्लीच्या तरुणाईचा नोकरीकडे (jobs) असणारा एकंदर कल प्रचंड बदलताना दिसत आहे. खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांशी काही मिनिटं संवाद साधला, तर तुमच्या एक बाब लक्षात येईल की सध्याच्या घडीला नोकरीच्या ठिकाणी कमाल मनस्ताप आणि किमान समाधान अशीच परिस्थिती दिसत आहे. आवडीपोटी स्वीकारलेली नोकरी अनेकजणांसाठी त्रासाचं कारण ठरताना दिसत आहेत. परिणामी बहुतांश युवापिढी खासगी क्षेत्राकडून अशा नोकऱ्यांकडे वळत आहे, जिथं सुट्ट्या (holidays) आणि पगारवाढीच्या (increament) बाबतीत त्यांना रेंगाळत राहावं लागणार नाही. तुम्हीही अशाच एखाद्या नोकरीच्या शोधात आहात का? मग ही संधी तुमच्यासाठीच आहे असं समजा... 

सध्या इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनकडून (IBPS) रिक्त जागांसाठी नोकरभरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रोग्रामिंग असिस्टंट (Programming Assistant) या पदासाठी ही नोकरी असणार आहे. सदर पदांवर तातडीनं भरती प्रक्रिया पूर्णत्वास नेण्यात येणार आहे. ज्याविषयीची सविस्तर माहिती ibps.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. (bank jobs ibps programming assistant recruitment 2022 latest marathi news)

वेतनाचे निकष... (salary structure)

IBPS च्या माध्यमातून बँकांमध्ये नोकरी मिळणाऱ्यांचं वेतन ब गटासाठीच्या तरतुदींनुसार असतं. सध्याच्या घडीला संकेतस्थळावरील माहितीनुसार नोकरीसाठी पात्र असणाऱ्यांतं (basic salary) मूळ वेतन 25 हजार रुपये इतकं असणार आहे. वेतनश्रेणीनुसार दरमहा भत्ते आणि इतर गोष्टी जोडून पगार जवळपास 47 हजार इतका असेल. निवृत्तीवेतन, विमा आणि तत्सम इतर गोष्टींची आकडेवारी केल्यास वार्षिक वेतनाचा आकडा 9 लाख रुपये इतका असेल. 

हेसुद्धा वाचा : पॅकेजिंगसाठी 1 जानेवारी 2023 पासून नवे नियम लागू, काय बदल होणार जाणून घ्या

नोकरीसाठी walk in interview पद्धतीचा अवलंब करण्यात येईल. थोडक्यात या नोकरीसाठी अर्ज दाखल करण्याची एक पायरी वगळण्यात आलेली असेल. इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीआधारे फॉर्म भरत 14 डिसेंबरआधी IBPS हाऊस, 90 फिट डीपी रोड, ठाकूर पॉलिटेक्निक मागे, ऑफ डब्ल्यूई हायवे, कांदिवली (पूर्व), मुंबई- 400101 या पत्त्यावर पाठवावा. 

शैक्षणिक पात्रता (qualification)

- उमेदवार प्राधान्याने MCA, B.Tech, B.Sc Computer Science, B.Sc IT पदवीधर असावेत. 
- वरील पदवी नसल्यास तत्सम पदवी प्रमाणपत्र असणारे उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. 
- नोकरीसाठी वयाची अट 23 ते 30 वर्षे इतकी आहे. 

सदर पदासाठी अर्ज करणाऱ्यांच्या यादीतून नावं निवडण्यात येतील. ज्यानंतर त्यांची 90 मिनिटांची एक online test घेण्यात येईल. पुढचा टप्पा असेल मुलाखतीचा. इंग्रजी भाषेत होणाऱ्या या परीक्षेत निगेटीव्ह मार्किंगही असणार आहे.