मुंबई : फिरायला प्रत्येकालाच आवडत असते,काही लोकच याला अपवाद असतील. मात्र जे कायम फिरणारे आहेत, त्यांच्यातील काहींना नेहमीच बजेटची चिंता सतावत असते. कारण जास्त बजेट असेल तर ते त्यांच्या अवाक्याबाहेर जाते आणि तेच कमी असेल तर ते बजेटमध्ये पार पडतेय.अशाच लो बजेट ट्रीप प्लान करणाऱ्यांसाठी आम्ही काही ठीकाण घेऊन आलं आहेत. ही ठिकाण कोणती आहेत ती जाणून घेऊय़ात.
जर तुम्ही कुटुंब किंवा मित्रांसोबत सहलीचा प्लॅन करत असाल, पण बजेट मार्गात येत असेल तर काळजी करण्याची गरज नाही.आज आम्ही तुम्हाला अशाच एका सुंदर ठिकाणाबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही कमी बजेटमध्येही फिरायला जाऊ शकता. या ठिकाणी मुक्काम मोफत आहे, फक्त 30 रुपयांत जेवणही मिळते.
आश्चर्यचकीत होण्याचे कारण नाही, आम्ही ऋषिकेशबद्दल बोलत आहोत, जिथे प्रवास करणे खूप स्वस्त आहे. तुम्ही इथे फक्त कमी बजेटमध्ये एक्सप्लोर करू शकता. म्हणून, जेव्हाही तुम्ही कमी बजेटमध्ये प्रवास करण्याची योजना आखाल तेव्हा ऋषिकेशला तुमच्या पसंतीच्या शीर्षस्थानी ठेवा.
सकाळची गंगा आरती
दररोज मोठ्या संख्येने पर्यटक आणि भाविक ऋषिकेशला भेट देण्यासाठी पोहोचतात. येथे भेट देण्यासाठी अनेक अद्भुत ठिकाणे आहेत. योग भूमी नावाच्या प्रसिद्ध ऋषिकेशमध्ये सकाळी आणि संध्याकाळी होणाऱ्या गंगा आरतीचे दृश्य अतिशय विलोभनीय आहे. या देखाव्याचा आनंद घेण्यासाठी देश-विदेशातूनही मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात. याशिवाय इतरही अनेक प्रसिद्ध ठिकाणे येथे पाहायला मिळतात.
मोफत राहण्याची सोय
ऋषिकेशला गेल्यावर गंगा नदीच्या तीरावर गीता भवन आहे. येथे राहायला मोफत आहे. 1000 खोल्यांच्या या आश्रमात तुम्ही मोफत राहू शकता. येथे दररोज मोठ्या संख्येने भाविक येतात. गीता भवनचा हॉल खूप मोठा आहे. इथे योग, मंत्र आणि जप चालूच असतात. यात तुम्ही पण सहभागी होऊ शकता. येथून तुम्ही संध्याकाळी गंगा आरती पाहू शकता. तुम्ही इथे जेवणही खाऊ शकता. गीता भवनात जेवण खूप स्वस्त आहे.
दरम्यान जर तुमचं लो बजेट असेल तर तुमच्यासाठी हे सर्वांत सुंदर स्पॉट आहे.