Love Sex Aur Dhoka: ती खूप सुंदर दिसायची. तिचं सौंदर्य एखाद्या अप्सरेला लाजवेल असंच होतं. ती एका खासगी एअरलाईन्स कंपनीत एयरहोस्टेस म्हणून काम करायची. मुळची आसाम इथं राहणारी ती मुंबईत कामानिमित्त वास्तव्याला होती.
या तरुणीची मुंबईत एका तरुणासोबत ओळख झाली. ओळखीचं रुपांत प्रेमात झालं. अनोळखी शहरात दोघेही एकटेच राहत होते. दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. ती त्याच्यावर निर्मळ प्रेम करायची पण त्याच्या मनात असं काही शिजत होतं की कल्पना करण्यापलिकडेच.
असामची ती तरुणी आणि मध्यप्रदेशातील तो तरुण मुंबईच्या अंधेरी परिसरात राहत होते. ती सुखी संसाराची स्वप्न पाहत होती आणि हा मात्र वासनेचं जाळं विणत होता. एखादी पक्षी शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकावा आणि शिकारी आनंदीत व्हावा तसेच भाव या तरुणाच्या मनात येत होते. वासनेची भूक भागवण्यासाठी त्याने तिला लग्नाचं अमिष दाखवलं. ती तरुणी त्या वासनांध तरुणाच्या जाळ्यात ओढली गेली आणि आपलं सर्वस्व त्या तरुणाला अर्पण केलं. ती संपूर्ण प्रेमसागरात बुडाली होती आणि हा वासनेची भूक भागवत होता. ती जेव्हा लग्नाचा विषय मांडायची तेव्हा तरुण मांडलेला खेळ गोड गोड बोलून मोडायचा. कारण तो फक्त वासनांध होता.
तरुण लग्नाच्या विषयाला बगल देतोय असं लक्षात आलं. आपली फसवणूक होतेय याची जाणीव त्या तरुणीला झाली. तरुणीच्या पायाखालची जमीन सरकली. तरुणीने थेट पोलीस स्टेशन गाठलं. तरुणाविरोधात तक्रार दिली. लग्नाचं आमिष दाखवून त्याने तिच्यावर अत्याचार केले होते. पोलिसांनी तरुणाला उचललं. तरुण गजाआड गेला. आपली सुटका करण्याच्या हेतूनं त्याने पुन्हा लग्नाचं आमिष दिलं. जामिन मिळवून घेतला. जामिन मिळताच तरुण तरुणीला घेऊन मध्यप्रदेश इथल्या घरी गेला. दोन दिवस तिथे राहिल्यानंतर तरुणीला तरुणाने बेदम मारहाण केली. कशीबशी सुटका करत तिने माधवनगर पोलीस स्टेशन गाठलं. तरुणीची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर तरुणाविरोधात स्थानिक पोलिसांनी कठोर कारवाई केलीय.
love and dhoka happened in real life with asamee girl by mumbai boy