हर हर शंभो... जगातील सर्वात उंच शिवमूर्तीचं आज लोकार्पण, जाणून घ्या वैशिष्ट्य

लिफ्ट, जिने, भव्य हॉल आणि बरंच काही... जगातील या सर्वात उंच शिवमूर्तीची उंची आणि वजन तुम्हाला माहित आहे?

Updated: Oct 29, 2022, 02:49 PM IST
हर हर शंभो... जगातील सर्वात उंच शिवमूर्तीचं आज लोकार्पण, जाणून घ्या वैशिष्ट्य title=

Lord Shiva Highest Statue: जगातील सर्वात उंच शिवमूर्तीचं (Lord Shiva Highest Statue) आज लोकार्पण होणार आहे. राजस्थानमधल्या (Rajasthan) राजसमंद (Rajsamand) इथल्या नाथद्वारा (Nathdwara) इथे ही मूर्ती उभारण्यात आली असून या शिवप्रतिमेला 'विश्वास स्वरुपम' असं नाव देण्यात आलं आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत जगातली सर्वात उंच शिवमूर्तीचं लोकार्पण करतील.  भगवान शंकराची ही मूर्ती तब्बल 369 फूट उंच आहे, तर वजन 30 हजार टन इतकं आहे. 

जगातील सर्वात उंच शिवमूर्ती
शिवमूर्तीचं लोकार्पण झाल्यानंतर 29 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरपर्यंत सलग 9 दिवस इथे धार्मिक, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. यादरम्यान मुरारी बापू राम कथा पाठचं ही आयोजन केलं आहे. या उंच प्रतिमेचं निर्माण करणाऱ्या तत पदम संस्थानचे ट्रस्टीआणि मिराज समूहाचे अध्यक्ष मदन पालीवाल यांनी ही माहिती दिली आहे. 

नाथद्वारच्या गणेश टेकडीवर ही भव्य शिवमूर्ती उभारण्यात आली आहे. ध्यान मुद्रेत बसललेले भगवान शंकर असं या मूर्तीचं स्वरुप आहे. ही जगातील सर्वात उंच शिव प्रतिमा आहे, याची उंची 369 फूट आहे, यात भक्तांसाठी लिफ्ट, जिने आणि भव्य हॉल अशा सुविधा आहेत. ही मूर्ती तयार करण्यासाठी तब्बल 10 वर्षे लागली. 2012 साली ही मूर्ती उभारण्याची योजना आखण्यात आली होती. त्यानतंर आता 2022 मध्ये या मूर्तीचं लोकापर्ण होत आहे. 

शिव प्रतिमेच्या सर्वात वरच्या भागात जाण्यासाठी 4 लिफ्ट आणि तीन जीने आहेत. ही मूर्ती बनवण्यासाठी 300 हून अधिका कारागिरांनी अहोरात्र मेहनत घेतली. यात 3 हजार स्टीर लोखंड आणि स्टिर, 2.5 लाख क्यूबिक टन सिमेंट आणि रेतीचा वापर करण्यात आला आहे. राजस्थानमधल्या उदयपूरपासून 45 किलोमीटवर दूरीवर हे ठिकाण आहे. 

याआधी जगातील सर्वात उंच शिवमूर्ती नेपालमध्ये आहे. कैलाशनाथ महादेव मंदिर इथं असलेली शिवमूर्तीची उंची 143 मीटर इतकी आहे. तर कर्नाटकमधल्या मरूदेश्वर मंदिर इथली शिवमूर्ती 123 मीटर उंच आहे. तामिळनाडू इथं 112 मीटर उंच शिवमूर्ती आहे. तर मॉरिशसमध्येही 108 मीटर उंच भगवान शंकराची मूर्ती उभारण्यात आली आहे. आता राजस्थानमधली शिव शंकराची मूर्ती ही जगातली सर्वात उंच मूर्ती ठरली आहे. 

मूर्तिकार नरेश कुमावत यांची तिसरी पिढी मूर्ती बनवण्याचं काम करतात. जगभरातील जवळपास 65 देशांत त्यांचं काम सुरु आहे. जपान, कॅनडा, अमेरिका यासह अनेक देशात लहान-मोठ्या मूर्ती बनवण्याचं काम कुमावत यांच्या संस्थेद्वारा सुरु आहे.