सदस्यत्व अर्ज दाखवत काँग्रेसचे सपना चौधरीला उत्तर

काँग्रेस पार्टीने थेट सपनाच सदस्यत्वाचा अर्जच सोशल मीडियात व्हायरल केला.

Updated: Mar 26, 2019, 04:49 PM IST
सदस्यत्व अर्ज दाखवत काँग्रेसचे सपना चौधरीला उत्तर  title=

मुंबई : हरीयाणातील प्रसिद्ध डान्सर सपाना चौधरीने काँग्रेसमधून उमेदवारी अर्ज भरल्याची चर्चा सुरू होती. पण सपनाने या वृत्ताचे खंडन करत आपण असा कोणता अर्जच भरला नसल्याचे सांगितले. पण दुसरीकडे काँग्रेसने तिचा सदसत्व अर्ज सोशल मीडियात जारी केला. सपनाच नव्हे तर तिच्या बहीणीने काँग्रेसच्या सदस्यत्वाचा अर्ज भरल्याचे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले. शनिवारी रात्री यूपी काँग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर यांनी सपनाचा प्रियांका गांधी यांच्या सोबतचा फोटो ट्वीट करत तिचे काँग्रेसमध्ये स्वागत केले. दुसऱ्या दिवशीच सपनाने आपला हा फोटो फार जुना असल्याचे सांगितले. तसेच आपण काँग्रेसमध्ये गेल्याच्या वृत्ताचे खंडन केले. या त्रासातून बाहेर पडण्यासाठी काँग्रेस पार्टीने थेट सपनाच सदस्यत्वाचा अर्जच सोशल मीडियात व्हायरल केला.

Image result for Sapna Chaudhary zee news

हरियाणाची डान्सर सपनाने सदस्यत्व अर्ज भरत काँग्रेस सदस्यत्व घेतल्याची माहिती यूपी काँग्रेस सचिव नरेंद्र राठी यांनी दिली.

Image result for Sapna Chaudhary zee news

यासोबत त्यांनी सपना सोबतचा एक फोटो देखील शेअर केला. या फोटोमध्ये सपना चौधरी कागदावर काहीतरी लिहीताना दिसत आहे.

Image result for Sapna Chaudhary zee news

राठीने सपनाचा सदस्यत्व अर्ज देखील दाखवला. ज्यावर सपनाचा फोटो आणि स्वाक्षरी देखील होती. 5 रुपये सदस्यत्व शुल्क देऊन 23 मार्चला ती काँग्रेसची सदस्या बनली होती. 

यानंतर मात्र तिने वृत्ताचे खंडन केले. मी काँग्रेसमध्ये सहभागी झाली नाही. प्रियांका गांधी-वाड्रा यांच्यासोबतचा माझा फोटो फार जुना आहे. मी कोणत्याही पार्टीसाठी निवडणुकी प्रचार करणार नसल्याचे तिने स्पष्ट केले. सपना ही हिंदी भाषिक राज्यांमधील तरुणांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. ती काँग्रेसमधून निवडणूक लढवेल आणि मथुरातून भाजपाच्या हेमा मालिनी यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरेल असे म्हटले जात होते.

Image result for Sapna Chaudhary zee news

पण सपनाला पार्टीत 'सहभागी' करुन घेण्याआधीच काँग्रेसने मथुरातून आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे हेमा मालिनी विरुद्ध सपना चौधरी या चर्चांना पूर्णविराम मिळाला. दरम्यान भाजपा खासदार मनोज तिवारी आणि सपना चौधरी यांच्या भेटीचे फोटो देखील सोशल मीडियात व्हायरल झाले.

BJP MP Manoj Tiwari meets Sapna Chaudhary, says will be happy if she campaigns for party

सपना जर भाजपाच्या प्रचाराचा हिस्सा बनली तर आम्हाला आनंदच होईल असे मनोज तिवारी यांनी म्हटले होते. त्यानंतर मनोज तिवारी हे सपनाचे मन वळवून भाजपात आणण्यास यशस्वी ठरले अशा चर्चाही सुरू झाल्या होत्या.