ओपिनियन पोल: अब की बार किसकी सरकार?

लोकसभा निवडणूक २०१९ चा ओपिनियन पोल

Updated: Jan 12, 2019, 07:33 PM IST
ओपिनियन पोल: अब की बार किसकी सरकार? title=

नवी दिल्ली : देशात सध्या लोकसभा निवडणुकीची चर्चा आहे. राजकीय वातावरण तापलं आहे. सर्वाधिक लोकसभेच्या जागा असलेल्या उत्तर प्रदेशात सपा-बसपाने आघाडी करत भाजपपुढचं आव्हान वाढवलं आहे. देशाला कल कोणाच्या बाजुने आहे. हे आताच सांगणं कठीण आहे. पण जर आज लोकसभा निवडणूक झाली तर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील का ? काँग्रेसला किती जागा मिळतील ?. कोणत्या राज्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळतील याचा ओपिनियन पोल सीएनएक्स आणि इंडिया टीव्हीने केला आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. सपा-बसपाने एकत्र पत्रकार परिषद घेत भाजपला युपीमध्ये आव्हान दिलं आहे. तर पंतप्रधान मोदी यांनी देखील दिल्लीत झालेल्या पक्षाच्या कार्यकर्त्या मेळाव्यात विरोधकांवर टीका करत आपण केलेल्या कामांचा पाढा वाचवून दाखवला.

ओपिनियन पोल

- उत्तराखंड : उत्तराखंडमध्ये लोकसभेच्या एकूण ५ जागा आहे. याठिकाणी भाजपला ४ तर काँग्रेसला १ जागा मिळताना दिसत आहे.

- छत्तीसगड : छत्तीसगडमधील ११ जागांच्या ओपिनियन पोलमध्ये आज निवडणुका झाल्या तर भाजपला ५ आणि काँग्रेसला ६ जागा मिळताना दिसत आहे.

- राजस्थान : राजस्थानमध्ये २५ जागांच्या ओपिनियन पोलमध्ये भाजपला १५ तर काँग्रेसला १० जागा मिळताना दिसत आहे. 

- मध्यप्रदेश : लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशमध्ये २९ पैकी भाजपला १८ तर काँग्रेसला ११ जागा मिळताना दिसत आहे.

- गुजरात : गुजरातमधील लोकसभेच्या एकूण २६ जागांपैकी ओपिनियन पोलमध्ये भाजपला २४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर २ जागा काँग्रेसच्या खात्यात जातील असं ओपिनियन पोलमध्ये दिसत आहे.

- हिमाचल : हिमाचलमध्ये ४ पैकी ४ ही जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे. ओपिनियन पोलमध्ये काँग्रेसला येथे ० जागा मिळताना दिसत आहे.

- गोवा: गोव्यामध्ये परिस्थिती काँग्रेस आणि भाजप दोघांच्या बाजुने दिसत आहे. दोघांना राज्यात १-१ जागा मिळताना दिसत आहे.

- नॉर्थ ईस्ट: नॉर्थ ईस्टमध्ये ओपिनियन पोलमध्ये भाजपला १७ जागा मिळताना दिसत आहे. काँग्रेसला येथे फक्त १ जागा मिळताना दिसत आहे. तर इतरांना येथे ७ जागा मिळताना दिसत आहे.

- तेलंगणा : १७ जागांपैकी काँग्रेस आणि भाजपला एकही जागा मिळणार नसल्याचं ओपिनियन पोलमध्ये समोर येत आहे. येथे टीआरएसला १६ तर एमआयएमला १ जागा मिळण्याची शक्यता आहे.

- आंध्र प्रदेश : एकूण २५ जागांपैकी ओपिनियन पोलमध्ये भाजपला येथे ही निराशा हाती लागणार आहे. भाजपला येथे एकही सीट मिळणार नसल्याचं समोर येतं आहे. काँग्रेसला ०२, टीडीपीला ०४ तर वायएसआरला १९ जागा मिळण्याची शक्यता आहे.

- तमिळनाडू : ३९ जागांपैकी ओपिनियन पोलमध्ये तमिळनाडूमध्ये भाजपला एकही जागा मिळणार नाही. तर काँग्रेसला ३, एआयएडीएमकेला १०, डीएमकेला २१ आणि इतरांना ५ जागा मिळण्य़ाची शक्यता आहे.

- जम्मू-कश्मीर : ६ जागांपैकी ओपिनियन पोलमध्ये भाजपला २, एनसीला १ तर पीडीपीला १ जागा मिळण्याची शक्यता आहे.

- हरियाणा : १० जागांपैकी भाजपला ८ तर काँग्रेसला २ जागा मिळण्याची शक्यता आहे.

- पंजाब : १३ जागांपैकी भाजपला एकही जागा मिळणार नसल्याचं ओपिनियन पोलमध्ये समोर येतं आहे. काँग्रेसला येथे ७, अकाली दलला ५ तर आपला १ जागा मिळण्याची शक्यता आहे. 

- दिल्ली : ७ पैकी भाजपला ५, काँग्रेस आणि आपला १-१ जागा मिळण्याची शक्य़ता आहे.

- उत्तर प्रदेश : एनडीएला २९, सपा-बसपाला ४९ तर काँग्रेसला २ जागा मिळण्याची शक्यता आहे. बसपाला येथे २० तर सपाला २७ मिळण्याची शक्यता आहे.

- बिहार : ४० पैकी ओपिनियन पोलमध्य़े भाजपला १३, आरजेडीला १०, जेडीयूला ११, काँग्रेसला २, एलजेपीला ३ जागा मिळण्याची शक्यता आहे. एक जागा इतरला मिळण्याची शक्यता आहे. 

- महाराष्ट्र : लोकसभेच्या ४८ जागा आहेतय यापैकी ओपिनियन पोलमध्ये भाजपला २२, काँग्रेसला ९, शिवसेनेला ८ तर राष्ट्रवादीला ९ जागा मिळण्याची शक्यता आहे.l

- झारखंड : १४ जागांपैकी भाजपला ७, जेएमएमला ४, काँग्रेसला २ आणि जेवीएमला १ जागा मिळण्याची शक्यता आहे.

- ओडिशा : २१ जागांपैकी ओपिनियन पोलमध्ये भाजपला ८, बीजेडीला १३ जागा मिळण्याची शक्यता आहे.

- पश्चिम बंगाल : लोकसभेच्या ४२ जागांपैकी ओपिनियन पोलमध्ये भाजपला १०, टीएमसीला २६, लेफ्टला २ तर काँग्रेसला ४ जागा मिळण्याची शक्यता आहे.

- केरळ : २० जागांपैकी ओपिनियन पोलमध्ये भाजपला १, काँग्रेसला ८, लेफ्टला ५ तर इतरांना ६ जागा मिळण्याची शक्यता आहे.

- कर्नाटक : लोकसभेच्या २८ जागा आहे. यापैकी ओपिनियन पोलमध्ये भाजपला १५, काँग्रेसला ९ तर जेडीएसला ४ जागा मिळण्याची शक्यता आहे.