पुणे : जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आले आहे. या हल्ल्यात पुण्याचे मेजर शशीधरन नायर शहीद झालेत. नायर यांनी अकरा वर्षे लष्करात देशसेवा केली. नायर यांच्या पश्चात पत्नी तृप्ती नायर आहेत. नायर यांच्या पार्थिवाला जम्मूमध्ये लष्कराच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. काही वेळात नायर यांचं पार्थिव पुण्यात आणण्यात येणार आहे.
राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यामध्ये एका मेजरसह दोन जवान शहीद झालेत. तसेस आणखी दोन जवान जखमी झालेत. सीमेवर शुक्रवारी सायंकाळी एक मोठा आयईडी स्फोट घडवून आणण्यात आला. यांत मेजर नायर यांना हौतात्म्य प्राप्त झालं.