लोकसभा निवडणूक २०१९ : या दोन मतदान केंद्रांवर आज सुरू आहे पुनर्मतदान

या मतदान केंद्रांवर १९ मे रोजी पार पडलेलं मतदान रद्द करण्यात आलंय

Updated: May 22, 2019, 11:02 AM IST
लोकसभा निवडणूक २०१९ : या दोन मतदान केंद्रांवर आज सुरू आहे पुनर्मतदान  title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०१९ चा उद्या अर्थात २३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. परंतु, आज मात्र दोन मतदान केंद्रांवर पुनर्मतदान होत आहे. लोकसभा निवडणूक २०१९ साठी सात टप्प्यांत १९ मे रोजी निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली. परंतु, अमृतसर आणि कोलकाता उत्तर लोकसभा मतदारसंघातील एक-एक मतदान केंद्रावर झालेल्या मतदानाला रद्द करण्यात आलंय. या दोन्ही मतदान केंद्रांवर आज निवडणूक आयोगाकडून पुनर्मतदान प्रक्रिया राबवण्यात येतेय. 

अमृतसर लोकसभा मतदारसंघाच्या मतदान केंद्र क्रमांक १२३ आणि २४ कोलकाता उत्तर लोकसभा मतदान केंद्र क्रमांक २०० वर पुनर्मतदान प्रक्रिया सुरू आहे. सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत इथं मतदान होणार आहे. 

मंगळवारी निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या एका पत्रकात याबद्दल माहिती देण्यात आली. या मतदान केंद्रांवर १९ मे रोजी पार पडलेलं मतदान रद्द करण्यात आल्याचं यात म्हटलं गेलं होतं. 

मतदान केंद्रासंबंधी रिटर्निंग ऑफिसर आणि जनरल निरीक्षकांकडून देण्यात आलेल्या माहितीनंतर आणि अन्य तथ्यांचा विचार करून पुनर्मतदानाचा निर्णय घेण्यात आल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं. मतदान प्रक्रियेत चुका आढळून आल्यानं या मतदान केंद्रांवरील मतदान रद्द करण्यात आल्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला.