'त्या' लहान मुलांच्या मृतदेहामागचं सत्य

भारताच्या ईशान्य भागात आलेल्या पुराबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. या घटनेबद्दल अनेकजण चिंता देखील व्यक्त करत आहेत.

Updated: Jul 22, 2019, 08:49 PM IST
'त्या' लहान मुलांच्या मृतदेहामागचं सत्य title=

पाटणा : भारताच्या ईशान्य भागात आलेल्या पुराबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. या घटनेबद्दल अनेकजण चिंता देखील व्यक्त करत आहेत. बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये आलेल्या पुरामध्ये अनेकजण वाहून गेले. पुरामध्ये अनेकांना स्वत:चा जीव गमवावा लागला. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहे. 

फोटो आणि व्हिडिओत एका छोट्या मुलाचा मृतदेह दिसत आहे. अनेक नेटकऱ्यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. हा व्हिडिओ आणि फोटो बघून अनेक जणांनी सिरियामध्ये झालेल्या घटनेची आठवण झाल्याचं सांगितलं. 

कारण जेव्हा सिरियामध्ये समुद्र किनारी वाहून आलेल्या शरणार्थीच्या मुलाच्या मृतदेहाचा फोटो जगासमोर आला होता. तेव्हा सगळ्या जगाने दु:ख व्यक्त केलं होतं. 

'मिथिलाच्या प्रलयकारी पुरात या मुलांचा करूण अंत झाला. तरी देखील या निरागस चिमुकल्यांसाठी कुणीही अश्रू वाहिले नाहीत', अशी पोस्ट एका नेटकऱ्याने टाकली आहे. 

व्हिडिओत एक मुलगा नदी किनारी पडलेला आहे, त्याच्याजवळ एक व्यक्ती दिसत आहे. 

मुझफ्फरपूरमध्ये या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच ट्विटर यूझर्स याविषयी राष्ट्रीय जनता दल सरकारावर टीका करीत आहेत.

मात्र यानंतर राष्ट्रीय जनता दलकडून त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर एक फोटो ट्विट करण्यात आला. या फोटोत नेमक यामागचं काय सत्य आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आता या फोटोवर अनेक जणांच्या नजरा खिळल्या आहेत. 

या फोटोमधील घटनेचा आणि बिहार पुराचा काय संबंध आहे. याबद्दल चित्र स्पष्ट होत आहे. या प्रकरणात मुलांच्या आईने मुलांना पाण्यात ढकलेले असल्याचं सांगण्यात येत आहे. पण याविषयी प्रथमदर्शनी कोणतीही खात्रीलायक माहिती नाही.

नवभारत टाइम्सच्या टीमने मुझफ्फरपूरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याविषयी संपर्क साधला. तेव्हा अशी माहिती मिळाली की, हे प्रकरण मुझफ्फरपूरमधील रानीखेरा येथील आहे आणि स्थानिक साक्षीदारांच्या मतानुसार या घटनेचा आणि नदीच्या पुराचा काहीही संबंध नाही. 

या प्रकरणाबद्दल जनसंपर्क कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, मीनापूर गावाताल रानीखेरा पंचायतच्या शीतलपट्टी गावातील तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तसेच या मुत्यूचा आणि पुराचा काहीही संबंध नाही.