Viral Video: लहान मुलाने मम्मीला असा वाढला डोसा, आता क्युट व्हिडीओ तुफान व्हायरल

लहान मुलांचे क्युट आणि गोड व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात.

Updated: Aug 27, 2022, 05:28 PM IST
Viral Video: लहान मुलाने मम्मीला असा वाढला डोसा, आता क्युट व्हिडीओ तुफान व्हायरल title=

Boy serving dosa to mom: सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल याबाबत काहीच सांगू शकत नाही. मात्र लहान मुलांचे क्युट आणि गोड व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. लोकांना मुलांमधील निरागसता आवडते आणि म्हणून या व्हिडीओजना सोशल मीडियावर प्रचंड प्रेम मिळतं. असाच एक नवा ट्रेंडिंग व्हिडीओ समोर आला आहे (New Trending Video). या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा आपल्या आईला अतिशय प्रेमाने जेवण वाढताना पाहायला मिळतो आहे.  

लहान मुलं अतिशय निरागस असतात. लहान मुलांचं मन स्वच्छ असतं. म्हणून लहान मुलं जे काही करतात त्याने आपल्या चेहऱ्यावर हास्य उमटतं. या व्हिडिओमध्येही लहान मुलाने असंच काही केल्याचं पाहायला मिळतंय. 

या मुलाने नेमकं काय केलं? पाहा 

या व्हिडीओमध्ये हा लहान मुलगा चांगलीच मेहनत करताना पाहायला मिळतो. या मुलाच्या हातात एक चमचा आहे. या चमच्यावर डोसा असल्याचं दिसतंय. या लहान मुलाच्या चेहऱ्यावरही टेन्शनही लगेच ओळखू येईल. हे टेन्शन आहे आपल्या हातातली डोसा पडू नये याचं. एकदा हा व्हिडीओ आधी पाहाच. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by joshiik (@josh_iik)

मेहनतीने डोसा वाढणारा लहानगा

हा लहान मुलगा एका खोलीतून बाहेर येतो. याच्या हातात एका चमच्यावर डोसा ठेवलेला पाहायला मिळतो. अतिशय सावधपणे हा मुलगा डोसा घेऊन येताना पाहायला मिळतो. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला तब्बल 1.1 मिलियन लोकांनी लाईक केलं आहे. या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही आल्या आहेत. 

little boy serving dosa to her mother video went viral on social media watch cutest video of year