IMD Weather Update : देशात हिवाळा, 'या' 7 राज्यांत पावसाळा; पाहा तुमच्या भागात कशी असेल परिस्थिती

IMD Weather Update : हवामानाचे सातत्यानं बदलणारे रंग पाहता, काय चाललंय काय? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. कारण हिवाळ्याची तयारी करून निघालेल्या अनेकांनाच अपेक्षित ठिकाणी पोहोचल्यावर पावसाचा सामना करावा लागत आहे.   

Updated: Jan 17, 2023, 11:20 AM IST
IMD Weather Update : देशात हिवाळा, 'या' 7 राज्यांत पावसाळा; पाहा तुमच्या भागात कशी असेल परिस्थिती title=
latest weather update rain predictions and snowfall alert in night jammu kashmir himachal

IMD Weather Update Rain Alert : दर दिवसागणिक थंडीचा कडाका वाढत चालला आहे. देशाच्या राजधानीसह संपूर्ण (Northern India) उत्तर भारतामध्ये थंडीची लाट आल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवारी वातावरण काहीसं बदललं पण, लगेचच रात्रीपासून देशभरात थंडीनं जोर धरण्यास सुरुवात केली. ज्यामुळं नागरी जीवनावर याचा परिणा झाला. (Delhi temprature) दिल्लीमध्ये सोमवारी तापमान 1.4 अंश सेल्सिअस असल्याची नोंद करण्यात आली. 2021 पासूनचं हे सर्वात निच्चांकी तापमान ठरलं आहे. आयएमडीनं दिलेल्या इशाऱ्यानुसार 17 आणि 18 जानेवारीला दिल्ली एनसीआर भागा थंडी आणखी वाढेल. यादरम्यान तापमान 1 ते 1.2 अंशांदरम्यान राहील. 

देशातील कोणत्या राज्यांमध्ये बरसणार पाऊसधारा? 

हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार सोमवारपासून ते 19 जानेवारी म्हणजेच गुरुवारपर्यंत देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी आणि धुक्याचा सामना करावा लागू शकतो. तर, 18 ते 20 या दिवसांमध्ये येथील बहुतांश राज्यांना पावसाचा मारा सहन करावा लागणार आहे. परिणामास्तव राजस्थान (Rajasthan), (Karnataka) कर्नाटकचा काही भाग, (Himachal Pradesh) हिमाचल प्रदेश, (Punjab) पंजाब, (Jharkhand) झारखंड, (Hariyana) हरियाणा आणि (Bihar) बिहारमध्ये पावसाचा शिडकावा होऊन थंडी वाढेल. हिमाचलच्या काही भागांमध्ये जोरदार बर्फवृष्टी होणार आहे, यामुळं पंजाबमधील तापमानात लक्षणीय घट असेल. (Arunachal) अरुणाचल प्रदेश आणि (Assam) आसाममध्येही पाऊस बरसणार आहे. उत्तराखंडमधील पर्वतीय भागांवर यादरम्यान बर्फाची चादर असेल, तर मैदानी क्षेत्रांमध्ये पावसाची हजेरी असेल. 

थंडीनं गाठलं शिखर... 

यंदाच्या वर्षी थंडीनं सर्वच मर्यादा ओलांडल्या असून अनेक वर्षांपासूनचे तापमानाचे विक्रमही मोडले आहेत. तिथं पर्वतीय भागांमध्ये जोरदार हिमवृष्टी होत असल्यामुळे इथे मैदानी भागांमध्ये त्याचे थेट परिणाम दिसून येत आहेत. ज्यामुळं दिल्ली एनसीआर, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात पुढील तीन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या दिवसांमध्ये इथं दृश्यमानता कमी असल्यामुळं दैनंदिन जीवनावर याचे थेट परिणाम दिसून येणार आहेत. 

हेसुद्धा वाचा : Gold Price: 28 महिन्यांचा विक्रम मोडला, सोनं झालं इतकं महाग, जाणून घ्या आजचा रेट

 

कधी होणार या बोचऱ्या थंडीपासून सुटका? 
20 जानेवारीनंतर अतिशय धीम्या गतीनं थंडीचं प्रमाण कमी होण्यास सुरुवात होणार आहे. देशात पश्चिमी झंझाात सक्रीय होणार आहे, ज्यामुळं थंडी काही प्रमाणात कमी होईल. पण, सध्या मात्र या बोचऱ्या थंडीपासून कुणाचीही सुटका नाही. 

बरं, अती उत्तरेकडे असणाऱ्या (Jammu Kashmir) जम्मू काश्मीरमध्ये मात्र थंडी कायम राहणार आहे. काश्मीर खोऱ्यात यादम्यान जोरदार हिमवृष्टी होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. ज्यामुळं प्रशासनही सतर्क आहे. तर, अवेळी पावसामुळं उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह इतर काही राज्यांतील नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहनही करण्यात येत आहे.