नवी दिल्ली : चारा घोटाळ्यामध्ये साडेतीन वर्षांची सजा झाल्यामुळे कारागृहात शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव हे तुरूंगाबाहेर येण्याची शक्यात वर्तविण्यात येत आहे. लालू प्रसाद यादव यांच्या सख्खी बहीण गायत्री देवी यांचे निधन झाले. सांगितले जात आहे की, बहिणीवरील अंत्यसंस्कारासाठी लालूंना पॅरोल मिळण्याची शक्यता आहे. लालू प्रसाद यादव यादव यांचे पूत्र तेजस्वी यादव यांनीही या शक्यतेला दुजोरा दिला आहे. पण, हे तेव्हाच शक्य होणार आहे, जेव्हा लालूंना पॅरोल रजा मंजूर होईल. दरम्यान, लालूंना पॅरोल मिळायचा असेल तर, सोमवारपर्यंत वाट पहावी लागणार आहे. कारण सोमवारी कोर्टाला सुट्टी असते.
लालू प्रसाद यादव यांची पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी सांगितले की, गायत्री देवी या लालूंपेक्षा चार वर्षांनी मोठ्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. लालू प्रसाद यांना शिक्षा होऊन ते प्रदीर्घ काळासाठी तुरूंगात गेल्याचे समजल्यावर त्या प्रचंड दु:खी झाल्या होत्या. तसेच, लालूंना मिळालेल्या शिक्षेबाबा त्यांना धक्काही बसला होता.
गंगोत्रीदेवी असे लालूंच्या बहिणीचे नाव आहे. त्या पटना येथील व्हेटरनरी कॉलेजच्या सर्वंट क्वार्टरमध्ये राहात होत्या. १९९० मध्ये मुख्यमंत्री झाल्यावर लालूंनी सहा महिने सरकार चालवले. दरम्यानच्या काळात लालूंनी याच क्वार्टरमधून सरकार चालवले होते. यादव कुटुंबियांच्या वर्तुळातील लोक सांगतात की, गायत्री देवी यांना लालूंबद्धल विशेष प्रेम होते. लालूंसह सहा भावांमध्ये गायत्रीदेवी ही एकटीच बहिण होती. गायत्री देवी यांना तिन मुले आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर, इतर दोन मुलांपैकी एक बिहार पोलिस तर, दुसरा रेल्वेत नोकरी करतो.
गायत्री देवी यांचे पुत्र बॅलिस्टर यादव यांनी सांगितले की, भावाला (लालूप्रसाद यादव) झालेल्या शिक्षेच्या धक्क्याने तिचा मृत्यू झाला. शिक्षा ठोठावली जाण्याच्या दिवशी ती संपूर्ण दिवस ईश्वराची प्रार्थना करत होती. तसेच, तिने अनेक वेळा माझ्याकडे आग्रह धरला होता की, मला लालूंसोबत बोलू देत. मात्र, बोलणे होऊ शकले नाही.