कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीचा भेटीदरम्यान अपमान- सुषमा स्वराज

 राज्यसभेतील निवेदनाद्वारे पाकच्या या भूमिकेचा निषेध करण्यात आला. सर्वपक्षीय सदस्यांनी याला पाठींबा दिला.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Dec 28, 2017, 04:19 PM IST
 कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीचा भेटीदरम्यान अपमान- सुषमा स्वराज title=

नवी दिल्ली : कुलभूषण आणि त्यांच्या आई, पत्नीच्या भेटीदरम्यान दोघींना पाकिस्तानतर्फे अपमानास्पद वागणूक दिल्याचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत सांगितले. भेटीसाठी दोघांचे सौभाग्यलंकार काढायला लावले. मानवाधिकारांचे उल्लंघन यावेळी झाले तसेच जाधवांच्या आईला सलवार कमीझ घालायला लावल्याचेही यावेळी सांगितले. सुषमा यांनी सांगितले.  राज्यसभेतील निवेदनाद्वारे पाकच्या या भूमिकेचा निषेध करण्यात आला. सर्वपक्षीय सदस्यांनी याला पाठींबा दिला.

पाकच्या माध्यमांची अपमानास्पद वागणूक 

पाकच्या माध्यमांना दोघींना अपमानास्पद वागणूक दिल्याचे सुषमा स्वराज यांनी सांगितले.  पाकिस्तानी मीडियाने दोघींवर खोटे आरोप केल्याचेही त्यांनी सांगितले. 

अटींच उल्लंघन 

पाकिस्तानने या भेटीदरम्याने मानवाधिकार तसेच नियम अटींचे उल्लंघन केले आहे. 

मराठीत बोलू दिल नाही

कुलभूषण यांच्या आईला मराठीत बोलण्यास मनाई करण्यात आली.