Kolkata Doctor Rape Murder Case : कोलकाता डॉक्टर हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासा झालाय. आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टरचा बलात्कार नाही तर सामुहिक बलात्कार झाल्याचा संशय पोस्टमॉर्टेम रिपोर्टनंतर (postmortem report) व्यक्त करण्यात येत आहे. यानंतर स्वतंत्र्यदिनाआधीच्या मध्यरात्री अचानक रस्त्यावर असंख्य बहिणींसह लोक उतरली. प्रचंड निदर्शने करण्यात आली. मात्र या निदर्शनाच्या नावाखाली गुंडांनी रुग्णालयात एवढा गोंधळ घातला की पोलिसांवर लाठीचार्ज करण्याची वेळ आली. हॉस्पिटल बाहेरील चित्र म्हणजे जणू रणांगणच वाटत होते. (kolkata doctor rape murder case What happened in rg kar medical hospital at midnight before independence day)
गुरुवारी मध्यरात्री काही अज्ञात चोरट्यांनी सरकारी आरजीच्या वेशात मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला. पोलिसांनी सांगितलं की, गेल्या आठवड्यात एका महिला डॉक्टरचा मृतदेह सापडलेल्या रुग्णालयाच्या भागाची तोडफोड करणाऱ्यांनी केली. रूग्णालयात डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येविरोधात महिलांनी केलेल्या निदर्शनेदरम्यान ही घटना घडली.
#Watch: A mob entered the RG Kar Medical College & Hospital & went on a rampage & carried out an unprecedented attack.
The protesting doctor’s stage vandalised.
Emergency department completely ransacked & vandalised.
Police kiosk inside the hospital toppled.
Police… pic.twitter.com/2MxEV5h7jF
— Pooja Mehta (@pooja_news) August 14, 2024
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांच्या वेशात सुमारे 40 जणांचा एक गट हॉस्पिटलच्या आवारात घुसला. त्यांनी पोलिसांवर दगडफेक आणि तोडफोड केली. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. या घटनेत घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांच्या वाहनाचे आणि काही दुचाकींचेही नुकसान झाल्याचं पोलिसांकडून माहिती देण्यात आलीय. या हिंसाचारात काही पोलीस अधिकारीही जखमी झाल्याचे एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलंय. खरं तर, सोशल मीडियावरील 'रिक्लेम द नाईट' मोहिमेमुळे, हे निषेध रात्री 11.55 वाजता सुरू झालं आणि त्वरीत लहान शहरं आणि मोठ्या शहरांच्या प्रमुख भागात वाऱ्यासारख पसरलं.
#Watch: Goons going on a rampage at RG Kar Medical College & Hospital last night.
This is how they ransacked & vandalised the ground floor of the emergency building. pic.twitter.com/FPERp9Amas
— Pooja Mehta (@pooja_news) August 15, 2024
या काळात राज्यभरात हजारो महिला रस्त्यावर उतरल्या. आंदोलक 'आम्हाला न्याय हवा' अशा घोषणा देत होते. कोलकातामध्ये रात्री 12 वाजण्याच्या सुमारास आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या बाहेर आंदोलक जमा झाले. महिला आणि इतर आंदोलक शांततेने निदर्शने करत होते आणि न्यायाची मागणी करत होते. मात्र त्यानंतर 12.30 च्या सुमारास अचानक संतप्त जमावाने हॉस्पिटलमध्ये घुसून तोडफोड करण्यास सुरुवात केली.
रात्री 12 वाजण्याच्या सुमारास महिला 'रिक्लेम द नाईट' मोर्चा काढत असताना अचानक 40 हून अधिक गुंडांनी येऊन ज्युनियर डॉक्टरांच्या स्टेजची नासधूस केली. त्यांनी बळजबरीने रुग्णालयात घुसून आपत्कालीन कक्षाची तोडफोड केली. पोलिसांकडे मदत मागितली असता त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही, असा आरोप डॉक्टरांनी केला आहे. गुंडही 'आम्हाला न्याय हवा' असं म्हणत होतं. यावरून हे समजू शकतं की गुंडांनी जाणूनबुजून आंदोलकांची कामगिरी बिघडवण्याचा प्रयत्न केला होता. आता प्रश्न पडतो की हे गुंड आंदोलकांमध्ये काय करत होते?
लाठीचार्ज केल्याने रुग्णालय पूर्ण रणांगण बनलं होतं. यावेळी पोलीस आणि जमावामध्ये झटापटही झाली. विटा आणि दगडांचा मारा सुरु झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अखेर लाठीचार्ज करावा लागला. 1 वाजल्यानंतर सीपी आल्यानंतरच परिस्थिती नियंत्रणात आली, या संपूर्ण प्रकरणात त्यांना पुरावे नष्ट करायचे होते. त्याचवेळी अभिषेक बॅनर्जी म्हणतात की, यामागे जो कोणी असेल त्याला सोडले जाणार नाही. टीएमसीच्या नेत्यांनी ट्विट केलं की हा सर्व गोंधळ 'रिक्लेम द नाईट' आंदोलनामुळे झाला आहे आणि त्याला भाजप जबाबदार आहे.
तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी सांगितलं की त्यांनी गोयल संवाद साधलाय आणि 'आजच्या हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्या प्रत्येकाची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई होईल.' यासोबतच त्यांचा राजकीय संबंध कोणताही असो, येत्या 24 तासांत त्यांना कायद्यासमोर हजर करण्यात यावे. त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलंय की, 'आज रात्री आरजी कार इथे झालेल्या गुंडगिरी आणि तोडफोडीने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून मी नुकतेच कोलकाता पोलीस आयुक्तांशी बोललो आहे. आंदोलक डॉक्टरांच्या मागण्या रास्त आहेत. त्यांनी सरकारकडून किमान एवढी अपेक्षा ठेवायला हवी. त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले पाहिजे.'
The hooliganism and vandalism at RG Kar tonight have exceeded all acceptable limits. As a public representative, I just spoke with @CPKolkata , urging him to ensure that every individual responsible for today’s violence is identified, held accountable, and made to face the law…
— Abhishek Banerjee (@abhishekaitc) August 14, 2024
तर भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी ही तोडफोड तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी केल्याचा आरोप केलाय की, ज्यांना पक्षाच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी पाठवले होते. अधिकारी यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटलंय की, 'ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या टीएमसीच्या गुंडांना मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलजवळ शांततापूर्ण निषेध रॅलीसाठी पाठवले आहे.
Mamata Banerjee has sent her TMC goons to the apolitical Protest Rally near RG Kar Medical College and Hospital.
She thinks that she is the most shrewd person in the whole world and people won't be able to figure out the cunning plan that her goons appearing as protestors would… pic.twitter.com/1CPI2f1KUr— Suvendu Adhikari (@SuvenduWB) August 14, 2024
तिला वाटते की ती जगातील सर्वात हुशार व्यक्ती आहे आणि तिचे गुंड आंदोलकांच्या वेशात जमावात घुसतील आणि मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये तोडफोड करतील ही धूर्त योजना लोकांना समजू शकणार नाही. पोलिसांनी हल्लेखोरांना सुरक्षित मार्ग दिल्याचा आरोपही या अधिकाऱ्याने केला आहे.'