Buttermilk Benefits : या उन्हाळ्यात स्मोक ताक नक्की पिऊन पहा ; आहेत खूप फायदे

Cooking Tips and tricks : उन्हाळ्यात, लोकांना पोट फुगणे, पचनाच्या समस्या, गॅस्ट्रो, भूक न लागणे यासारख्या पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागतो, ज्यावर ताकाचे नियमित सेवन केल्याने मात करता येते.

Updated: Mar 8, 2023, 07:10 PM IST
Buttermilk Benefits : या उन्हाळ्यात स्मोक ताक नक्की पिऊन पहा ; आहेत खूप फायदे   title=

Buttermilk Benefits : तापमानात सातत्याने वाढ होत असून, त्यातून दिलासा मिळण्याची आता आशा करायचीच नाही. कडक उन्हाळा आता सुरु झाला आहे. कडक सूर्यप्रकाश आणि घाम येणे यामुळे शरीराचे हायड्रेशन होते. त्यामुळे यावेळी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे, जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता भासू नये. पाण्याशिवाय तुम्ही हेल्दी ज्यूस आणि शेक देखील पिऊ शकता. यासोबतच नारळ पाणी, लस्सी आणि ताक यांसारखी नैसर्गिक पेये देखील आहेत, ज्यामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.

ताक उष्णतेपासून तुमचे संरक्षण तर करतेच, पण अन्न पचण्यासही मदत करते. हे खूप हलके आहे. तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात नियमितपणे ताक प्यायल्यास अनेक आजार तुमच्यापासून दूर राहतील.
दही आपल्या  शरीरासाठी खूप फायदेशीर (benefits of curd) आहे हे आपण सारेच जाणतो, असं म्हणतात की दह्यावरचं पाणी प्यायल्याने भूक वाढते.अनेक आजारांवर दही गुणकारी आहे,इतकंच काय तर सुंदरतेसाठीसुद्धा दह्याचा वापर अनेक फेसपॅक मध्ये केला जातो. 

दह्यापासून बनलेलं ताकसुद्धा शरीरासाठी तितकंच उपयुक्त आहे, आपल्याकडे फार पूर्वीपासून जेवणासोबत दही किंवा ताक देण्याची पद्धत आहे. आयुर्वेदात ताकाला अमृतपेय म्हटलं जात. आपल्या शरीरात टॉक्सिन्स असतात ते वॉश करण्यासाठी ताक फार उपयुक्त असतं. 
उन्हाळ्यात ताक प्यायल्याने शरीराला आराम मिळतो. उष्णतेचा त्रास कमी होऊन जातो. दह्यात भरपूर पाणी घालून ताक बनवलं जात त्यामुळे शरीराला पाणी मिळतं आणि हायड्रेट राहण्यास मदत मिळते. (how to make smoked flavoured chhas cooking tips)

आजकाल आपल्याकडे बऱ्याच पदार्थाना वेगवेगळे फ्लेवर देऊन ट्विस्ट दिला जातो आणि त्याची चव वाढवण्याचा प्रयत्न केला जातो.  दम चहा, दम पुलाव असे अनेक पदार्थ आहेत पण तुम्हाला माहित आहे का तुम्ही आता ताकाला सुद्धा फ्लेव्हर्डमध्ये बनवू शकता . तुम्ही अनेक फ्लेवरच ताक  या आधी प्यायला पण असाल पण, स्मोक्ड फ्लेवर ताक कधी ट्राय केलयं का ? चला आज जाणून घेऊया स्मोक्ड फ्लेवर्ड ताक बनवण्याची सोपी पद्धत. 

साहित्य

पुदिन्याची पाने - ३ टेबलस्पून 
 कोथिंबीर - ३ टेबलस्पून 
 हिरची मिरची - १
जिरे पावडर - १ टेबलस्पून
सैंधव मीठ  - १/४ टेबलस्पून 
 पाणी - २ कप 
स्मोक देण्यासाठी लागणारं साहित्य 
एक कोळश्याचा तुकडा 
एक टेबलस्पून तूप 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dhruvi Jain (@burrpet_)

कृती

दह्यात पाणी मिसळून छान ताक बनवून घ्या,  आता यात कोथिंबीर आणि मिरची एकत्र करून बनवलेली पेस्ट मिसळा चांगलं ढवळून घ्या, आता यात एक सिल्वर फॉईल बवत्सरखा दुमडून ठेऊन द्या त्यात गरम केलेला कोळसा ठेवा त्यावर तूप घाला आणि झाकण ठेऊन द्या. २ मिनिटांनी झाकण उघड आणि तयार आहे खास स्मोक्ड फ्लेवर ताक.