Viral Train Accident : रेल्वे अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल; कमजोर हृदयाच्या व्यक्तींनी हा व्हिडीओ पाहूच नये

Viral train Accident : रेल्वे अपघाताचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे , जो पाहून अक्षरशः अंगाचा थरकाप उडेल. धावती ट्रेन पकडण्याच्या नादात जीवावर कसं बेतू शकतं हे दाखवणारा हा व्हिडीओ पाहायलाच हवा आणि त्यातून शिकण्यासारखं आहे कि, एखादी ट्रेन चुकली तरी चालेल पण धावती ट्रेन पकडूच नये 

Updated: Mar 8, 2023, 06:56 PM IST
Viral Train Accident : रेल्वे अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल; कमजोर हृदयाच्या व्यक्तींनी हा व्हिडीओ पाहूच नये  title=

Viral Train Accident : मुंबई नगरी , सर्वांच्या स्वनांची ही मायानगरी. इथे असणारा प्रत्येकजण पोट भरण्यासाठी इथे येतो कष्ट करतो, सकाळी उठल्यापासून मुंबईकर धावत असतो मग ती घाई कामावर पोहचण्यासाठी , शाळेत जाण्यासाठी , कॉलेजमध्ये वेळेत पोहचण्यासाठी असते.

प्रत्येकालाच वेळेत ठरलेल्या ठिकाणी पोहचायचं असतं. घाईघाईत आपण घरातून निघतो रिक्षा,बस, ट्रेन मिळेल ते पकडून इच्छित ठिकाणी पोहचन्यासाठी स्ट्रगल करतो. त्यात मुंबई लोकल आणि गर्दी हे समीकरण आपण सारेच जाणतो. अक्खी मुंबई लोकलने प्रवास करते . अशावेळी

गर्दीचा किंवा ट्रेनचा अंदाज लागत नाही आणि काही अपघात होतात. (viral train accident)

असाच एक काळीज पिळवटून टाकणाऱ्या अपघाताचा एक व्हिडीओ (viral video) सध्या सोशल मीडियावर (social media) तुफान व्हायरल होत आहे.  हा व्हिडीओ पाहून आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. आतापर्यंत अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे आणि

शेअर केला जातं आहे. व्हिडीओ व्हायरल होतोय त्यामुळे तो कधीच आहे किंवा कुठे घडलेला आहे हे अद्याप तरी कळू शकलं नाहीये. पण व्हिडीओ अत्यंत भयंकर असाच आहे. (viral train Accident Video)

व्हिडीओ मध्ये आपण पाहू शकतो, एक लोकल प्लॅटफॉर्मवर येऊन थांबते, प्रवासी ज्यांना उतरायचं आहे ते बाहेर निघतात ज्यां ती ट्रेन पकडायची आहे ते ट्रेनमध्ये चढतात, ट्रेन सुरु होते आणि इतक्यात एक तरुण धावत येऊन ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करतो आणि इतक्यात त्याचा तोल जातो आणि तो चालत्या ट्रेनखाली येतो आणि......

पुढे जे घडतं ते पाहून काळीज पिळवटून निघेल असच म्हणावं लागेल, करणं तरुण लोकलखाली अडकतो आणि लोकल सुरु होते , वाचण्यासाठी तो धडपडत असतो पण ट्रेन सुरु झालेली असते. अशातच तो उठण्याचा प्रयत्न करतो तोच त्याच पूर्ण शरीर धावत्या लोकलसोबत गोलगोल फिरलं जातं. अक्षरशः संपूर्ण शरीर लोकलखाली फरफटत पुढे जातं.  (Viral Shocking train accident scarry video viral on social media)

अर्थातच पुढे या तरुणासोबत काय घडलं तो जिवंत राहिला कि मृत झालं हे सांगता येत नाहीये, करणं पुढे काय घडलं त्याचा व्हिडीओ किंवा माहिती नाहीये. पण यातून एकच सांगावस वाटत ते म्हणजे एक ट्रेन गेली कि दुसरी येतेच त्यासाठी जीवाशी कशाला खेळायचं धावतंय ट्रेन का पकडायची? आपली एक चूक आपल्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे काळजी घ्या. आणि धावत्या ट्रेनमध्ये चढू किंवा उतरू नका. (Viral Shocking train accident scarry video viral on social media)