Panipuriwala Viral News: उच्चशिक्षित आणि मोठ्या पदावरच्या व्यक्तीलाही लाजवेल, पाणीपुरीवाल्याची Monthly कमाई ऐकून वाटेल आश्चर्य

Viral Video Panipuriwala: आपल्या सर्वांनीच पाणीपूरी खायला खूप आवडते. रोज पाणीपूरीवाल्याकडे येणाऱ्या खवय्यांची संख्या ही चागंलीच मजबूत असते. आपल चाट म्हणून पाणीपूरीकडे (panipuri) पाहतोच पण त्याचसोबत आपल्याला पाणीपूरी ही कधीही खायला आवडते इतकी की आपण ती घरीही बनवून खातो.

Updated: Dec 15, 2022, 09:00 PM IST
Panipuriwala Viral News: उच्चशिक्षित आणि मोठ्या पदावरच्या व्यक्तीलाही लाजवेल,  पाणीपुरीवाल्याची Monthly कमाई ऐकून वाटेल आश्चर्य title=
panipuriwala news

Viral Video Panipuriwala: आपल्या सर्वांनीच पाणीपूरी खायला खूप आवडते. रोज पाणीपूरीवाल्याकडे येणाऱ्या खवय्यांची संख्या ही चागंलीच मजबूत असते. आपल चाट म्हणून पाणीपूरीकडे (panipuri) पाहतोच पण त्याचसोबत आपल्याला पाणीपूरी ही कधीही खायला आवडते इतकी की आपण ती घरीही बनवून खातो. परंतु आवडीनं पाणी पुरी खाणाऱ्या आपल्याला पाणीपूरीवाला किती कमावतो याची कल्पनाही कदाचित नसेल. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर जबरी व्हायरल झाल आहे. या व्हिडीओत (video) एका पाणीपूरीवाल्यानं आपली महिन्याची सॅलरीचं सांगितली आहे. (know panipuri seller monthly income how much he is earning viral video)

रस्त्याच्या कडेला एका कोपऱ्यात बसणारा पाणीपूरीवाला जर महिन्याला हजारो रूपये कमवतं असेल तर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही, हो, हा पाणीपुरीला महिन्याला किती पैसे कमावतो हे जाणून तम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये या पाणीपुरीवाल्या (panipuri seller monthly income) दिवसाच्या हिशोबानं तो महिन्याला किती कमावतो याचा आकाडा आणि हिशोब समजावून सांगितला आहे. 

आपल्याला असं वाटतं की रस्त्यावरच्या फेरीवाल्यांकडे कदाचित एवढे पैसे नसतील आणि इतर उद्योजकांच्या मानाने ते नक्कीच कमी पैसे कमावतात. परंतु आता आपल्याला या भ्रमाचा भोपळा फोडायचा आहे. एखाद्या फ्रेशरला जितकी सॅलरी मिळत नसेल त्याच्यापेक्षाही जास्त हा पाणीपुरीवाला महिन्याला कमावतो आहे. अलीकडेच @bakhaishrey या Instagram खात्यावर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे ज्यामध्ये ब्लॉगरने पाणीपुरीचे उत्पन्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ शेअर करताना लिहिले होते की आता शाळा - नोकरी करण्यापेक्षा आपणही पाणीपूरीच विकायला पाहिजे, अशी गंमत करत त्यानं या पाणीपुरीवाल्याकडून त्याची खरी कमाई व्यवस्थित हिशोबासह बाहेर काढली आहे. 

पाहा व्हिडीओ - 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पाहा त्याचा महिन्याचा हिशोब? 

या पाणीपुरीवाल्याकडे रोज 200-250 लोकं रोज पाणीपुरी खाण्यासाठी येतात. त्याच्याकडे विकेंला 20 हून जास्त लोकं वाढतात. 40-50 रूपयांची ऑर्डर दररोज त्याच्याकडे येतात. या हिशोबानं त्याचा 20 टक्के नफा होतो. तो महिन्याला 54 हजार रूपये कमावतो. त्याच्या या व्हिडीओवर अनेक लोकांनी पॉझिटिव्ह कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी त्याला आपला हा छोटासा बिझनेस वाढण्याचा सल्ला दिला आहे.