शिकवणीच्या नावाखाली मौलवी CCTV वर पडदा टाकून विद्यार्थ्यांसोबत...

मौलवी मदरशात शिवकणी घ्यायचा. या मदरशात एक 12 वर्षीय विद्यार्थी शिकवणीला जायचा. 4 दिवसांपूर्वी मौलवीने रात्री मुलाला आपल्या खोलीत बोलावले.

Updated: Dec 15, 2022, 08:54 PM IST
शिकवणीच्या नावाखाली मौलवी CCTV वर पडदा टाकून विद्यार्थ्यांसोबत... title=

देशभरात बलात्काराच्या (Misbehave) दररोज अनेक घटना घडत असतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत शिकवणीच्या नावाखाली मौलवी विद्यार्थ्यांसोबत (Student misbehave) बलात्कार करायचा. साधारण महिनाभर मौलवी विद्यार्थ्यासोबत असे कृत्य करायचा. मौलवीच्या हे क्रुर कृत्य आता उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपी मौलवीला ताब्यात घेतले आहे. 

मौलवी मदरशात शिवकणी घ्यायचा. या मदरशात एक 12 वर्षीय विद्यार्थी शिकवणीला जायचा. 4 दिवसांपूर्वी मौलवीने रात्री मुलाला आपल्या खोलीत बोलावले. यावर मदरशाच्या संचालकाने त्याची चौकशी केली असता त्याने मुलाला ताप असल्याचे सांगितले. यादरम्यान संचालकाला मौलवींच्या बोलण्यावर संशय आला होता. 

मुलांवर करायचा दृष्कृत्य

मौलवी विद्यार्थ्यांना कोणत्याही वेळेत बोलवायचा. वरील पिडीत मुलाला त्याने रात्रीच्या दरम्यान बोलावले होते. यावेळी त्याने मदरशातील सीसीटीव्हीवर (CCTV) पडदा टाकून त्याच्यासोबत दृष्कृत्य केले. साधारण अनेक महिने हे असेच चालत होते. 

या घटनेच्या दुसऱ्या दिवशी मुलाचे कुटुंबीय त्याला भेटायला आले होते. यादरम्यान त्याने जे ऐकले ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती. साधारण गेल्या एक महिन्यापासून मौलवी त्याच्यासोबत गैरवर्तन करत असल्याचे समोर आले.त्यानंतर कुटूंबियांनी मदरशाच्या मौलवीवर मुलावर बलात्काराचा (Student misbehave) आरोप केला होता. तसेच पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांना या घटनेची माहिती 14 डिसेंबर रोजी मिळाली होती. तक्रार नोंदवल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. मदरशातील इतर विद्यार्थ्यांचीही चौकशी केली जाईल, असे डीसीपी उत्तर सागर सिंह कलसी यांनी सांगितले आहे.  

दिल्लीच्या सराय रोहिल्ला परीसरात ही घटना घडली आहे. या घटनेने अनेकांना मोठा धक्का बसला आहे.