मुंबई : आधार कार्ड (aadhaar card) हे कोणत्याही व्यक्तीसाठी त्याच्या प्रमुख कागदपत्रांपैकी एक आहे. बँकिंगपासून ते इतर महत्त्वाच्या कामांपर्यंत याची गरज सर्वत्र लोकांना भासते. यामध्ये लहानांपासून ते मोठयांपर्यंत सगळ्यांसाठीच हे अगदी महत्वाचे कागदपत्र आहे. शाळेतील प्रवेश असो किंवा इतर कोणत्याही गोष्टीं प्रत्येक गोष्टीसाठी लहान मुलांसाठी देखील आधार कर्ड (aadhaar card) उपयोगी ठरू शकते.
परंतु बऱ्याचदा काही लोकांना हे माहित नसते की, ते त्यांच्या लहान मुलांचे देखील आधार कार्ड काढले जाऊ शकते. जर तुमच्या लहान मुलाचे वय 5 वर्षांपेक्षा कमी असेल, तर तुम्ही बायोमेट्रिक डेटाशिवाय देखील आधार कार्ड (aadhaar card) बनवू शकता.
लहान मुलांचे आधार कार्ड हे निळ्या रंगाचे असते. परंतु हे लक्षात असु द्या की, तुमच्या मुलाचे वय 5 वर्षांपेक्षा जास्त झाल्यानंतर हा बाल आधार कार्डे अवैध ठरेल. म्हणून, त्यांना अपडेट करणे आवश्यक आहे. यासाठी पालकांना यूआयडीएआयच्या संकेतस्थळावर अर्ज करता येईल.
याशिवाय आधार केंद्राला भेट देऊन बायोमेट्रिक अपडेट करावे लागेल. तुम्ही अनेक सरकारी योजनांचा लाभ या बाल आधार कार्डाद्वारे (aadhaar card) मिळू शकता.
लहान वयातच मुलांचे बाल आधार जर बपालकांनी बनवले असल्यास, त्यास अपडेट करण्यासाठी पालकांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.
असे आधार कार्ड वयाच्या 15 वर्षापर्यंत विनामूल्य अपडेट केले जाऊ शकतात. परंतु हे काम करण्यासाठी, संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला एका नवीन मार्गाने करावी लागेल.
लहान मुलांचे आधार कार्ड बनवण्यासाठी पालक जवळच्या आधार केअर सेंटरशी संपर्क साधू शकतात. येथे तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. यासह मुलाच्या जन्माच्या दाखल्याची कॉपी, पासपोर्ट आकाराचे फोटो आणि मुलाच्या पालकांच्या आधार कार्डची प्रत जोडावी लागेल.
मुलाच्या जन्म प्रमाणपत्र व्यतिरिक्त आपण त्याच्या शाळेच्या ओळखपत्राद्वारे आधार कार्डसाठी अर्ज करू शकता. तसेच, पालकांना त्यांच्या घराच्या पत्त्यासाठी त्यांचे कोणत्याही ओळखपत्र दाखवण्याची आवश्यकता असेल.
लहान मुलाचे आधार कार्ड तयार करण्यास सुमारे 90 दिवस लागतील. आधारसाठी अर्ज करताना आपणास एनरोलमेंट स्लिप मिळेल. त्यानंतर तुम्ही या स्लीपवरील आपण आयएसएएम नोंदणी आयडीद्वारे आधारची स्थिती तपासू शकता.