या भाजप खासदाराला विमान चालवताना पाहून डीएमके खासदाराला बसला आश्चर्याचा धक्का

डीएमके खासदाराने शेअर केला हा सुखद अनुभव

Updated: Jul 15, 2021, 07:04 PM IST
या भाजप खासदाराला विमान चालवताना पाहून डीएमके खासदाराला बसला आश्चर्याचा धक्का title=

मुंबई : दिल्ली ते चेन्नई प्रवास करणारे डीएमके खासदार दयानिधी मारन (Dayanidhi Maran) पायलटला पाहून हैराण झाले. कारण विमान चालवणारे पायलट दुसरे कोणी नाही भाजपचे खासदार राजीव प्रताप रूडी (Rajiv Pratap Rudy) होते. दयानिधी मारन यांनी ट्विटरवर त्यांच्या अनुभव शेअर केला आहे.

दयानिधी मारन (Dayanidhi Maran) यांनी म्हटलं की, 'मी एका बैठकीसाठी दिल्ली ते चेन्नई प्रवास करत होतो. इंडिगोच्या विमानातून (IndiGo Flight) प्रवास करत असताना मी पहिल्या लाईनमध्येच बसलो होतो. अचानक पायलटच्या ड्रेसमध्ये एक व्यक्ती आले आणि मला म्हणाले, तुम्ही पण विमानातून प्रवास करताय. मी त्यांना आधी ओळखूच शकलो नाही. कारण त्यांना मास्क घातला होता. पण त्यांचा आवाज ओळखीचा वाटत होता.

दयानिधी मारन (Dayanidhi Maran) पुढे लिहितात की, 'मी हो बोललो, पण त्यांना ओळखू शकलो नाही. त्यानंतर ते म्हणाले तुम्ही मला ओळखत नाही का? मला त्यानंतर कळाले की, हे तर माझे मित्र आणि खासदार तसेच माजी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रूडी (Rajiv Pratap Rudy) आहेत.

दयानिधी मारन (Dayanidhi Maran) यांनी म्हटलं की, 2 तासापूर्वी दोघे संसदीय समितीच्या बैठकीत चर्चा करत होतो. नंतर ते मला एका कॅप्टनच्या रुपात दिसले. मला डोळ्यांवर विश्वासच होत नव्हता. हे एक सुखद आश्चर्य होतं.'

A Flight to Remember': When DMK MP Dayanidhi Maran Found that the Pilot Was  a BJP MP With Whom He Held Meeting 2 Hrs Ago

कमर्शियल पायलट आहेत राजीव प्रताप रूडी

राजीव प्रताप रूडी (Rajiv Pratap Rudy) बिहारच्या छपरा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी (BJP) चे लोकसभा खासदार आहेत. ते नागरिक उड्डयन मंत्री (Civil Aviation Minister) देखील होते. ते एक कमर्शिअल पायलट देखील आहेत.