Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर !

सोन्याच्या किंमतीत वाढ

Updated: Mar 16, 2021, 11:34 AM IST
Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर ! title=

नवी दिल्ली : सोन्याचा दर (Gold Rate) हा गेल्या अनेक वर्षातील महागाई मोजण्याच मापन बनलाय. गुंतवणूकदार सोन्याला  महत्त्वाची गुंतवणूक (Gold Investment) मानतात. भारतात चांदीचे दागदागिने (Silver Jewellery) सोन्यांच्या दागिन्यांइतकेच (Gold Jewellery) लोकप्रिय आहेत. भारतात सोने आणि चांदी (Gold And Silver) मोठ्या प्रमाणात वापरली जाते. चांदी एक चमकदार धातू असून सोन्यापेक्षा स्वस्त आहे. 1 किलो चांदीची किंमत 15 ग्रॅम सोन्याच्या बरोबरीने असते. भारतात, चांदीचा वापर पैंजण आणि अंगठी बनवण्यासाठी केला जातो.

चांदीचा वापर भारतात खाण्यासाठी होतो. भारतात तुम्हाला चांदीच्या समावेश केलेल्या अनेक प्रकारच्या मिठाई दिसू शकतात. लोक मोठ्या उत्साहाने चांदीचे वर्क असलेल्या मिठाई खातात. 

भारतात काल 22 कॅरेट सोन्याची किंमत 44 हजार 160 रुपये इतकी होती. आज २२ कॅरेट सोन्याचा दर 44 हजार 150 रुपये इतका झालाय. सोन्याच्या दरात आज 10 रुपयांनी घट पाहायला मिळाली.

चांदी महागली

काल एक किलो चांदीची किंमत 67 हजार 400 रुपये इतकी होती. तर आज यामध्ये वाढ होऊन 67 हजार 700 रुपये इतकी किंमत झालीय. चांदीच्या दरात एका दिवसात 200 रुपयांनी वाढ झालीय.

दरात घसरण

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरांत सतत चढ-उतार होत आहे. कोरोना काळात जवळपास 60 हजार रूपायांच्या घरात पोहोचले होते. पण अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी देशाचं आर्थिक बजेट सादर केल्यानंतर सोन्याचे दर कमी झाले होते. त्यानंतर सोन्याच्या दरात घसरण दिसून आली.  मात्र गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात येत आहे.