अखेर सरसंघचालक भागवत यांच्याकडून केरळमध्ये ध्वजारोहण

ध्वजारोहणापासून रोखलेल्या सरसंघचालक मोहन भागवत यांनी अखेर केरळमध्ये ध्वजारोहण केलं. केरळच्या पलक्कडमधील एका शाळेत जिल्ह्या प्रशासनाने त्यांना तिरंगा फडकण्यास मनाई केली होती. 

Updated: Aug 15, 2017, 11:23 AM IST
अखेर सरसंघचालक भागवत यांच्याकडून केरळमध्ये ध्वजारोहण title=

पलक्कड़ : ध्वजारोहणापासून रोखलेल्या सरसंघचालक मोहन भागवत यांनी अखेर केरळमध्ये ध्वजारोहण केलं. केरळच्या पलक्कडमधील एका शाळेत जिल्ह्या प्रशासनाने त्यांना तिरंगा फडकण्यास मनाई केली होती. 

स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेला एक मेमो दिला होता. यात म्हटले होते की, कोणताही नेता सरकारच्या मदतीने चालवल्यात जात असलेल्या शाळेत भारतीय ध्वज फडकवू शकत नाही. 

केरळच्या पलक्कडमध्ये एका शाळेमध्ये ध्वजारोहणासाठी मोहन भागवतांना आमंत्रण देण्यात आलं होतं. पण एखादा राजकीय नेता शाळेमध्ये ध्वजवंदन करु शकत नाही, असा आक्षेप स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. त्यामुळे मोहन भागवत यांना झेंडावंदनापासून रोखण्यात आलं होतं.

पण त्यानंतर शाळा प्रशासनाने मध्यस्थी करत, मोहन भागवतांना आपण आमंत्रण दिल्याचं सांगून, त्यांना झेंडावंदनाची परवानगी देण्याची मागणी केली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना झेंडावंदनाची परवानगी दिली.