Karnataka News: 562 वर्ष जुन्या मशिदीमध्ये जमावाने बळजबरीने घुसून केली पूजा, Video व्हायरल

Heritage Madrasa: मिळालेल्या माहितीनुसार 6 ऑक्टोबरच्या रात्री 2 वाजता डझनभर लोक अचानक मशिदीत घुसले आणि पूजा केली. 

Updated: Oct 7, 2022, 11:26 AM IST
Karnataka News: 562 वर्ष जुन्या मशिदीमध्ये जमावाने बळजबरीने घुसून केली पूजा, Video व्हायरल  title=
Karnataka News mob Puja in Madrasa Video viral on social media nmp

Puja in Madrasa : आताची सर्वाच मोठी बातमी....562 वर्ष जुन्या मशिदीमध्ये जमावाने घुसखोरी कडून बळजबरीने पूजा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्नाटकातील ( Karnataka) बिदरमध्ये (Bidar) दसऱ्याच्या मुहूर्तावर ऐतिहासिक महमूद गवान (Mahmood Gawan) मशिदीमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच तणावाचं वातावरण आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार 6 ऑक्टोबरच्या रात्री 2 वाजता डझनभर लोक अचानक मशिदीत घुसले आणि पूजा केली. जमावाने घोषणाबाजी करत मशिदीची तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 1460 साली बांधलेला बिदर जिल्ह्यातील महमूद गवान मदरसा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) अंतर्गत येतो. (Karnataka News mob Puja in Madrasa Video viral on social media nmp)

70 जणांवर गुन्हा दाखल 

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी 70 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी 9 नावाजलेल्या लोकांपैकी 4 जणांना अटक केली आहे, तर इतर 5 जणांचा शोध सुरू आहे. बिदरच्या अनेक मुस्लिम संघटनांनी (Muslim organizations) या घटनेचा निषेध केला असून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.

कॅम्पसमध्ये वर्षातून दोनदा पूजा केली जाते

बिदर पोलिसांचे म्हणणे आहे की, मशिदीच्या आवारातील मिनारजवळ हिंदू समाज वर्षातून दोनदा पूजा करत असतो, मात्र यावेळी अचानक जमाव मदरशात घुसला आणि आतमध्ये पूजा करण्यास सुरुवात केली तसेच घोषणाबाजी केली.

ओवेसींनी भाजपवर निशाणा साधला

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी या घटनेवरून राज्यातील सत्ताधारी भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे आणि मुस्लिमांना कमी करण्यासाठी अशा घटनांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.