वाराणसी : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपची स्पष्ट बहुमातकडे वाटचाल होताना दिसतेय. या सोबतच काँग्रेसने देशातील आणखी एक राज्य गमावलेय. या निवडणुकीदरम्यान बाबा रामदेव यांनी २०१९च्या निवडणुकीबाबत मोठी भविष्यवाणी केलीये. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजय मिळवणाऱा पक्ष २०१९मध्येही विजय मिळवेल अशी भविष्यवाणी त्यांनी केलीये. कर्नाटक निवडणूक राष्ट्रीय राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहे. जो पक्ष दक्षिणेतील या राज्यात विजय मिळवेल तेच पुढील लोकसभा निवडणुकीत विजयाची पताका उंचावण्यात यशस्वी ठरु शकतात असे बाबा रामदेवांनी म्हटलेय. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात ते बोलत होते. कर्नाटक निवडणूक भारतीय राजकारणाला नवी दिशा देणार. कर्नाटक निवडणूक जिंकणाऱ्या पक्षाकडे २०१९ची लोकसभा निवडणूक जिंकण्याची क्षमता आहे.
भाजपने शंभराचा आकडा ओलांडला आहे. भाजपा स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करत असल्याचं दिसत आहे. भाजपाचे उमेदवार १०२ जागांवर तर काँग्रेस ६५ जागांवर आघाडीवर आहे. जेडीएस ४२ जागांवर आघाडीवर आहे. एकंदरीत भाजपच्या पारड्यात सर्वात मोठा आकडा कन्नडी जनतेने टाकला आहे. यावर भाजपची पुढील रणनीती पक्षाचे अध्यक्ष अमित शाह काय ठरवतीय यावर अवलंबून आहे, पण भाजपाचा आतापर्यंतचा सत्ता स्थापनेचा इतिहास बघितला तर भाजपाला १०० पेक्षा जास्त जागा असतील तर सत्ता स्थापन करण्यात मोठी अडचण येणार नसल्याचं दिसून येत आहे. कर्नाटकात अजूनही ११ जागांचा कल राहिलेला आहे. (अपडेट 9.45 सकाळी)