कर्नाटक निवडणूक आणि भाजप उमेदवाराचे ५०० कोटींचे डील

कर्नाटकात मतदान प्रक्रियेला आवघे काही तास शिल्लक राहिले आसताना  खासदार श्रीरामलू यांचा ५०० कोटी रुपयांचा डील करताना व्हिडिओ काँग्रेसने प्रसिद्ध केलाय. 

Updated: May 11, 2018, 09:07 AM IST
कर्नाटक निवडणूक आणि भाजप उमेदवाराचे ५०० कोटींचे डील  title=

बंगळुरु : मतदान प्रक्रियेला आवघे काही तास शिल्लक राहिले आसताना  रेड्डी ब्रदर्सचा उमेदवार खासदार श्रीरामलू यांचा ५०० कोटी रुपयांचा डील करताना व्हिडिओ काँग्रेसने प्रसिद्ध केलाय. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढू शकते. भ्रष्टाचाराला थारा नाही, सांगणाऱ्या भाजपला या व्हिडिओने चपराग लगावलेय. श्रीरामलू हे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात बदामी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात आहेत.

भाजपचे उमेदवार श्रीरामलू हे  मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात बदामी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात आहेत. या ठिकाणी काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगत आहे. संपूर्ण देशाचे या निवडणुकीकडे लक्ष लागलेय. दरम्यान, भाजप उमेदवाराच्या डीलचा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्याने भाजपची अडचण वाढलेय. या व्हिडिओमधे सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश बालकृष्ण यांचे नातेवाईक हे खाण सम्राट जनार्दन रेड्डी आणि खासदार श्रीरामलू हे डील करत आसताना दिसत आहेत.