कर्नाटक सत्ता संघर्ष : कडक पोलीस बंदोबस्तात काँग्रेस-जेडीएसचे आमदार विधानभवनात

कर्नाटकात येडियुरप्पांना आज बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.  दरम्यान, राज्याबाहेर गेलेले आमदार कर्नाटकात दाखल झालेत.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 19, 2018, 11:04 AM IST
कर्नाटक सत्ता संघर्ष : कडक पोलीस बंदोबस्तात काँग्रेस-जेडीएसचे आमदार विधानभवनात title=
संग्रहित छाया

बंगळुरु :  कर्नाटकात येडियुरप्पांना आज बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. दुपारी चार वाजता कर्नाटकच्या राजकारणाचे पुढचं चित्र ठरणार आहे. बहुमत सिद्ध होण्याआधी धोरणात्मक निर्णय घेण्यासही येडियुरप्पांना मनाई करण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसला दिलासा मिळालाय. दरम्यान, राज्याबाहेर गेलेले आमदार कर्नाटकात दाखल झालेत. ते आज विधीमंडळ सभागृहात कडेकोट पोलीस बंदोबस्तात काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार दाखल झालेत. आज सकाळी कर्नाटक विधानसभेच्या बहुमतासाठी जेडीएस आणि काँग्रेसचे आमदार बंगळुरुकडे रवाना झाले होते. जेडीएसचे  आमदार विमानातून तर काँग्रेसचे आमदार बसमधून रवाना झाले होते.

दरम्यान, राज्याबाहेर गेलेले सर्व आमदार सकाळी कर्नाटकात आलेत. सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना शनिवारी बहुमत सिद्ध करण्यास सूचना केल्यात. त्यामुसान आज बहुमताचा कौल अजमावला जाणार आहे. दरम्यान, राज्यपाल यांनी १५ दिवसांची मुदत दिली होती. त्यामुळे घोडेबाजार होण्याची शक्यता होती. न्यायालयाच्या निर्णयानंतर बहुमत सिद्ध करण्याच्या पूर्वसंध्येला कर्नाटकातला  घोडेबाजार चांगलाच तेजीत आलाय. सत्ता स्थापनेसाठी आमदारांच्या फोडाफोडीचे प्रयत्न सुरू आहेत. 

याचसंदर्भात काँग्रेसनं पत्रकार परिषद घेऊन भाजपचे माजी मंत्री आणि खाण माफिया जनार्दन रेड्डींची ऑडिओ क्लीप प्रसिद्ध केलीय. रायचूर ग्रामीण मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार बसनगौडा दड्डल यांना गळाला लावण्यासाठी जनार्दन रेड्डींनी फोनवरून संपर्क साधल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.दरम्यान हे सर्व आरोप भाजपनं फेटाळून लावले आहेत.