नवी दिल्ली: जुळी मुले झाल्याच्या आनंदात साजऱ्या केल्या जाणाऱ्या पार्टीत झालेल्या गोळीबारात एका युवकाचा जागेवरच मृत्यू झाला. आरोपी युवकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करू त्याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीकडून एक पिस्तूलही जप्त केले आहे. हे पिस्तूल बाळगण्याचा कोणताही परवाना आरोपीकडे नाही. दरम्यान, सांगितले जात आहे की, ज्या बंदुकीतून गोळी झाडली गेली ती घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवीणचीच होती. प्राप्त माहितीनुसार, प्रवीण हरियाणाच्या सुलतानपूर येथील डबास गावात राहणाऱ्या आपल्या मेव्हण्याच्या घरी आला होता. मेव्हण्याच्या घरी काही दिवसंपूर्वीच जुळी बाळं जन्माला आली होती. या आनंदात गुरूवारी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीतच हा प्रकार घडला.
दरम्यान, मेव्हण्याच्या घरी आयोजित असलेल्या पार्टीत सहभागी होण्यासाठी प्रविण आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुखमेलपूर गावचा प्रमोदही या पार्टीत सहभागी होता. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सुलतानपुरातील डबास गावात एका युवगाचा गोळी लागून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थली पोहोचले तेव्हा, प्रमोद आणि त्याचे मित्र फायरींग करत होते. फायरींग दरम्यान, बंदुकीतून सुटलेली गोळी प्रविणच्या डाव्या हातातून डोक्यात घुसली आणि ती कवटी भेदून आरपार निघून गेली. यात प्रविणचा जागेवरच मृत्यू झाला.
पोलीसांनी घटनास्थळावरून आरोपी प्रमोदला ताब्यात घेतले. ही बंदुक (पिस्तूल) प्रमोदचे दोस्त किंवा स्वत: प्रविणच घेऊन आला होता, असा पोलिसांना संशय आहे. ही बंदुक वापरण्याचे कोणताही परवाणा उपस्थितांपैकी कोणाकडेही नव्हता. पोलिसांनी मृदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. प्रवीण आणि त्याचा दोस्त मोबाईल टॉवरवर बूस्टर लावण्याचा व्यवसाय भागिदारीत करतात. तसेच, व्यवसायातील वादातून प्रमोदने प्रवीणवर गोळी झाडली असावी असा पोलिसांना संशय आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.