Karanataka Crime : कर्नाटकात (Karanataka News) एका तरुणाने प्रेयसीची गळा चिरून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोघेही अभियांत्रिकीचे विद्यार्थी असून एकाच महाविद्यालयात शिकत होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे प्रेमसंबंध सुरु होते. मात्र काही कारणांमुळे ते वेगळे झाले आणि हा सगळा प्रकार घडला. पोलिसांनी (Karanataka Police) आरोपी प्रियकराला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
कर्नाटकच्या हासन जिल्ह्यात हा सगळा खळबळजनक प्रकार घडला आहे. हसन जिल्ह्यात एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने आपल्या गर्लफ्रेन्डला निर्जन ठिकाणी बोलावून तिचा गळा चिरला. पोलिसांनी 23 वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले आहे. दोघेही इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिकत असून ते रिलेशनशिपमध्ये असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र काही काळापासून त्यांच्या नात्यात अनेक अडचणी येत होत्या. त्यातून ही घटना घडल्याचे म्हटलं जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेच्या दिवशी दोघांमध्ये वाद झाला होता. तेजस असे आरोपीचे नाव आहे. तर सुचित्रा असे पीडितेचे नाव आहे. दोघेही इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिकले होते. दोघांची मैत्री झाली आणि नंतर ते रिलेशनशिपमध्ये आले. मात्र, नंतर दोघांमध्ये वारंवार भांडणे होऊ लागली. त्यांच्यात नेहमी वाद होत असत. भांडणामुळे नात्यात दुरावा निर्माण झाला आणि नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. यानंतर आरोपी तेजसने प्रेयसी सुचित्राची हत्या केली.
तेजसने पोलिसांना सांगितले की, सुचित्रासोबतच त्याचे महाविद्यालयापासून संबंध होते. सततच्या भांडणामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. अनेक दिवसांच्या भांडणानंतर अखेर सुचित्राने तेजसशी संबंध तोडले. या ब्रेकअपचा तेजसला खूप राग आला होता. गुरुवारी तेजसने सुचित्राला त्यांच्या नात्याबाबात चर्चा करण्याच्या बहाण्याने कुंठीबेट्टा येथील उद्यानात बोलावलं होतं. तिथेही दोघांचा वाद झाला. रागाच्या भरात तेजसने सोबत आणलेल्या चाकूने सुचित्राचा गळा चिरून खून केला.
त्यानंतर एका उद्यानात मुलीचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले होते. त्यावेळी पोलिसांनी सुचित्राचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत सापडला. सुचित्राच्या मानेवर धारदार शस्त्राच्या खुणा असल्याचे पोलिसांना दिसले. सुचित्राने निळ्या रंगाचा लेगिंग आणि लाल कुर्ता घातला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला होता. मुलीसोबत एक तरुण दिसल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी अधिक तपास करुन तेजसला ताब्यात घेतलं.