पंतप्रधान मोदी मला घाबरतात - मुख्यमंत्री सिद्धरामय्या

नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटक दौ-यावर काँग्रेसच्या राज्य सरकारवर प्रश्न उपस्थित केले होते. यावर उत्तर देतांना मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी सोमवारी म्हटलं की, कर्नाटक दौ-यात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर त्यांच्यावर हल्ला यासाठी केला कारण राज्यात त्यांची लोकप्रियता वाढली आहे. एवढेच नाही तर सिद्धाराय्या पुढे म्हणाले, 'पंतप्रधान मला घाबरतात. म्हणूनच मला प्रत्येक वेळी कर्नाटक दौ-यावर टार्गेट करतात. '

Updated: Oct 31, 2017, 01:04 PM IST
पंतप्रधान मोदी मला घाबरतात - मुख्यमंत्री सिद्धरामय्या title=

नवी दिल्ली : नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटक दौ-यावर काँग्रेसच्या राज्य सरकारवर प्रश्न उपस्थित केले होते. यावर उत्तर देतांना मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी सोमवारी म्हटलं की, कर्नाटक दौ-यात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर त्यांच्यावर हल्ला यासाठी केला कारण राज्यात त्यांची लोकप्रियता वाढली आहे. एवढेच नाही तर सिद्धाराय्या पुढे म्हणाले, 'पंतप्रधान मला घाबरतात. म्हणूनच मला प्रत्येक वेळी कर्नाटक दौ-यावर टार्गेट करतात. '

सिद्धाराय्या यांनी म्हटलं की, त्यांच्या यशामुळे मोदी माझावर जळत आहेत आणि ते माझी खूर्ची खेचण्यासाठी इच्छुक आहेत. पंतप्रधान मोदींनी कर्नाटक दौऱ्यात म्हटलं होतं की, "एका पंतप्रधानाने म्हटले होते की, 'जेव्हा दिल्लीतून रुपया निघतो तेव्हा गावापर्यंत पोहोचेपर्यंत तो १५ पैश होऊन जातो. मला विचारायचे आहे, हे एक रुपयाला घासणारा पंजा कोणता आहे. जो १ रुपयाला घासून 15 पैसे करुन टाकतो? '

सिद्धारमैया म्हणाले की, 'हे लोक ठरतील की कोण राहतील आणि कोण जातील. त्यांनी नंजनगुंड पोटनिवडणुकीत काँग्रेसची निवड केली होती, ते 2018 मध्येही आम्हाला मतदान करतील. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, चमुंडेश्वरी विधानसभा क्षेत्रात भाजपा आणि जनता दल (सेक्युलर) एकत्र येऊन त्यांना पराभूत करू इच्छितात परंतु त्यांना यश मिळणार नाही. भाजपच्या 150 जागा 50 जागांवर येऊन घसरेल.