'या' व्यक्तीच्या खोडसाळपणामुळे झाले जेट एअरवेजचं इमरजन्सी लॅन्डिंंग

सोमवारी एका व्यावसायिकाने विमानाच्या वॉशरूममध्ये धमकी देणारी नोट ठेवल्याने गोंधळ झाला होता. 

Updated: Oct 31, 2017, 12:40 PM IST
'या' व्यक्तीच्या खोडसाळपणामुळे झाले जेट एअरवेजचं इमरजन्सी लॅन्डिंंग  title=

मुंबई : सोमवारी एका व्यावसायिकाने विमानाच्या वॉशरूममध्ये धमकी देणारी नोट ठेवल्याने गोंधळ झाला होता. 

धमकीचं पत्र मिळाल्याने मुंबईहून दिल्लीला जाणारे विमान अहमदाबादला वळवण्यात आले. त्यानंतर सार्‍या प्रवाशांची आणि विमानाची झडती घेण्यात आली आहे.  पण यामागे घातपाताचाप्रकार नसून एका व्यावसायिकाचा विकृतपणा असल्याचे स्पष्ट झाले आहे.  

बिरजू किशोर सल्ला या गुजराती व्यावसायिकाने हा खोडसाळपणा केलेला आहे. नेहमीप्रमाणे बिरजू बिझनेज क्लासने प्रवास करत होते. वॉशरूमधील टॉयलेटपेपरचा रोल संपल्याचे सांगून त्यांनी विमानातील एका कर्मचार्‍याला वॉशरूममध्ये पाठवले. तेव्हा तिला धमकीचं पत्र मिळाले. 

मुंबईहून निघालेले हे  विमान दिल्लीला न नेता थेट पाक व्याप्त काश्मिरमध्ये न्यावे अशी धमकी देण्यात आली होती. त्यामुळे पायलटने या विमानाचे अहमदाबादला इमरजंसी लॅन्डिंग केले. 

जेट एअरवेजच्या या विमानामध्ये ११५ प्रवासी आणि ७ कर्मचारी होते. त्यांची तसेच विमानाची तपासणी झाली. तेव्हा बिरजू यांनी खोडसाळपणा केल्याचं लक्षात आले. यापूर्वीदेखील बिरजू यांनी जेवणात स्वतःहून झुरळ मिसळून जेट एअरवेजला बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता.