Karnataka Assembly Election 2023: निवडणुकीत मतदारांना (Voters) आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून मतदारांना विविध आमिष दाखवली जातात. पण अशी आमिष देणं कायद्याने गुन्हा आहे. निवडणूक आयोगाकडून (Election Commission) अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर नियम केले जातात. पण कितीही नियम केले तरी लपुन-छपून असे प्रकार घडतच असतात. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Election 2023) याचं ताजं उदाहरण पाहिला मिळत आहे. येत्या मे महिन्यात कर्नाटक विधानसभेच्या 244 जागांसाठी निवडणूक होणार आहे. कोणत्याही पक्षाने अद्याप आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. पण त्याआधीच इच्छुक उमेदवारांनी (Candidate) जय्यत तयारी सुरु केली आहे. इतकंच काय तर मतदारांना आकर्षित करण्यासाठी नव-नवे प्रकार शोधून काढले आहेत.
निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर केल्यानंततर राज्यात आदर्श आचार संहिता लागू होते. कर्नाटकमध्ये या नियमांपासून वाचण्यासाठी आमदार आणि इच्छुक उमेदवारांनी दोन महिनेआधीपासूनच मतदारांना गिफ्ट वाटायला सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक उमेदवार आपल्या मतदार संघात 5 ते 30 कोटी रुपयांपर्यंत खर्च करत आहे.
एलआयसीचे हफ्ते, फ्री कोचिंगचं आमिष
काही उमेदवारांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी दारू, साड्या, प्रेशर कुकर आणि टेलिव्हिजन सेट वाटले जात आहेत. पण काही उमेदवार बदलत्या काळानुसार हायटेक झाले आहेत. काही उमेदवारांनी आपल्या मतदारांच्या जीवन बीमा प्रिमिअमचे हफ्ते चुकते केले आहेत. हुबळी धारवाड इथल्या इथल्या एका इच्छुक उमेदवाराने आयएएस, पीएसआय परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग मिळावं यासाठी एका स्थानिक कोचिंग सेंटरशी हातमिळवणी केली आहे. इतकंच नाही तर आर्थिक परिस्थिती बिकट असणाऱ्या कुटुंबातील महिलांना मोफत शिलाई प्रशिक्षणही देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
इच्छुक उमेदवाराने दिलेल्या माहितीनुसार कोचिंगच्या दोन बॅच झाल्य असून आता तिसरी बॅच सुरु आहे. याशिवाय जवळपास 2000 महिलांना शिलाई प्रशिक्षण दिलं जात आहे. एका मतदारसंघात महिलांना 600 शिलाई मशिनचं वाटप करण्यात आलं आहे. एका मतदार संघात इच्छुक उमेदावाराने महिलांसाठी स्वंयरोजगार प्रशिक्षण संस्था सुरु केली आहे.
मतदारांना पिकनिकला पाठवलं जातंय
त्या उमेदवारांने केलेया दाव्यानुसार स्त्री शक्ती ही मुख्या ताकद आहे. आतापर्यंत 20,000 महिलांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. हे कमी की काय प्रत्येक बॅच पूर्ण झाल्यानंतर 200 ते 300 महिलांना ट्रीपला पाठवला जात आहे. कर्नाटकातील बनशंकरी, धर्मस्थळ, पट्टडकल्लू, दानम्मा देवी मंदिर आणि यासारख्या धार्मिक स्थळांची तीन ते चार दिवसांची टूर आयोजित केली जात आहे.
एलईडी टीव्ही म्हणजे व्होट पक्क
इतर गिफ्टमध्ये डिनर सेट, प्रेशर कुकर, डिजिटल वॉच, सोन्याची अंगठ्या आणि साड्यांचा समावेश आहे. पण एलईडी टीव्ही देणं म्हणजे एक मत पक्कं असं समीकरण बांधलं जात आहे. काही ठिकाणी भव्य लंच आणि डिनरचं आयोजन केलं जात आहे. 18 फेब्रुवारी झालेल्या महाशिवरात्री निमित्ताने तर बंगळुरुमध्ये बक्षिसांचा पाऊस पाडण्यात आला. तांदूळ, डाळ, तेल अशा दैनंदिन वस्तूंचंही वाटप केलं जात आहे.
उमेदवारांचं म्हणणं काय?
एका इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या माहितीनुसार आता मतदारही हुशार झाले आहेत. पैसे किंवा गिफ्ट दिल्याशिवाय मतदार आपलं मत देत नाहीत. 2008 विधानसभा निवडणुकीनंतर मतदानाचा ट्रेंड बदलला आहे. केवळ प्रचार आणि मतदारांच्या गाठीभेटी घेऊन आता चालत नाही, तर आपला प्रभाव पाडण्यासाठी आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रलोभनं द्यावी लागत आहेत.