VIDEO VIRAL : 'ही माझी भूमी, मी हिंदीत का बोलू?', रिक्षा चालक- पॅसेंजरचा कडाडून वाद

VIDEO VIRAL : सोशल मीडियावर व्हायरल होणारे असंख्य व्हिडीओ बऱ्याच विषयांना वाव देतात. सध्याचा व्हिडीओ मातृभाषेला अधोरेखित करत आहे. परराज्यात गेलं असता तुम्ही नेमकं कसं वागाल? व्हिडीओ पाहूनच ठरवा.   

Updated: Mar 13, 2023, 12:21 PM IST
VIDEO VIRAL : 'ही माझी भूमी, मी हिंदीत का बोलू?', रिक्षा चालक- पॅसेंजरचा कडाडून वाद  title=
bengaluru Auto driver lashes out at passenger over hindi laguage watch Video

VIDEO VIRAL : आपण जिथं लहानाचे मोठे होतो, ज्या भूमीत वाढतो, आयुष्याचे नवनवीन टप्पे सर करतो अशा मातृभूमीविषयी आपण कायमच कृतज्ञ असतो. बऱ्याचदा हे प्रेम आणि आदर इतका वाढतो की अनेकजण 'कट्टर' म्हणून अशा व्यक्तींची ओळख सांगतात. इथं या मुद्द्याची चर्चा होण्याचं कारण ठरत आहे सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ. जिथं मातृभाषेचा मुद्दा बराच चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं. 

व्हिडीओमध्ये बंगळुरुतील एक (Auto driver) रिक्षाचालक मोठमोठ्यानं प्रवासी महिलेशी वाद घालताना दिसत आहे. 'मी कन्नड भाषेत का बोलू?' असा प्रश्न ती महिला प्रवासी रिक्षाचालकाला करत आहे, तर तोसुद्धा ही आमची मातृभूमी आहे आम्ही हिंदीत का बोलू असा प्रतिप्रश्न करत तिच्यावर आगपाखड करताना दिसत आहे. (twitter) ट्विटरच्या माध्यमातून व्हायरल होणाऱ्या या काही सेकंदांच्या व्हिडीओनं अनेक व्ह्यूज मिळवले असून, त्याबाबत प्रचंड चर्चाही होताना दिसत आहेत. (bengaluru Auto driver lashes out at passenger over hindi laguage watch Video)

प्राथमिक माहितीनुसार या रिक्षाचालकानं रिक्षामध्ये बसलेल्या प्रवाशांना कन्नडमधून संवाद साधण्यास सांगितलं. यावरून आम्ही कन्नड भाषेत बोलणार नाही, आम्ही का बोलू कन्नडमध्ये असा प्रश्न त्याला केला. वाद तेव्हा विकोपास गेला जेव्हा रिक्षा चालकानं प्रवासी महिलांना रिक्षातून उतरवलं आणि त्यानं शाब्दिक वार करणं सुरुच ठेवलं. 

'हे कर्नाटक (Karnakataka) आहे, तुम्ही कन्नडमध्येच बोलणं अपेक्षित आहे. तुम्ही सगळे उत्तर भारतीय... ही आमची मातृभूमी आहे, तुमची नाही. मी हिंदीत का बोलू?' अशा चढ्या स्वरात त्यानं प्रवाशांशी वाद घातला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ समोर येताच अनेक मुद्द्यांवरून चर्चा झाली. त्यात काही नेटकऱ्यांनी आपण ज्या ठिकाणी जातो तिथं स्थानिक भाषेचा मान ठेवण्याचा मुद्दा अधोरेखित केला. काहींनी वाद घालणारी दोन्ही माणसं इंग्रजीतून वाद घालत होती, मग भाषेचा मुद्दाच कुठं उरला असा उपरोधिक प्रश्नही केला. 

हेसुद्धा वाचा : Corona Cases India: दहशत 2.0; देशभरात एका दिवसात कोरोनाचे 500 नवे रुग्ण, आरोग्य यंत्रणा सतर्क 

 

आता भाषेच्या मुद्द्यावरून झालेला हा वाह पाहता एका राज्याचे नागरिक म्हणून आणि एक प्रवासी म्हणून अशा दोन्ही दृष्टीकोनांतून विचार केल्यास तुमची भूमिका काय असेल? कमेंट्समध्ये कळवा.