Venus-Jupiter conjunction : 1-2 मार्चच्या सायंकाळी सूर्यास्तानंतर पाहा गुरू आणि शुक्राच्या युतीचा अनोखा नजराणा

शुक्र आणि गुरू हे एकमेकांपासून फक्त 29.4 आर्कमिनिट किंवा सुमारे अर्धा अंश अंतरावर दिसतील. एखाद्या Binary Stars प्रमाणे ते दिसू शकतील. Binary Star हे एकमेकांच्या जवळ असल्याचे भासतात.

Updated: Mar 1, 2023, 10:24 PM IST
Venus-Jupiter conjunction : 1-2 मार्चच्या सायंकाळी सूर्यास्तानंतर पाहा गुरू आणि शुक्राच्या युतीचा अनोखा नजराणा title=

Venus, Jupiter will shine together tonight : आज खगोलप्रेमीसाठी मोठी पर्वणी असणार असणार आहे. आज सूर्यास्तानंतर आकाशात सूर्यमालेतील सर्वात ग्रह गुरु आणि सर्वात उष्ण ग्रह शुक्र यांची युती होताना पाहायला मिळणार आहे. आज हे दोन्ही ग्रह जवळ असल्याचे भासतील. 

शुक्र आणि गुरू हे एकमेकांपासून फक्त 29.4 आर्कमिनिट किंवा सुमारे अर्धा अंश अंतरावर दिसतील. एखाद्या Binary Stars प्रमाणे ते दिसू शकतील. Binary Star हे एकमेकांच्या जवळ असल्याचे भासतात. प्रत्यक्षात मात्र हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या दूर असतात. हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या साधारण 400 मिलियन माईल्स दूर असल्याचा अंदाज आहे.  आकाश निरीक्षण करताना आपल्या डोळ्यांसमोर Index Finger धरल्यास ते अंतर 1 अंश असते. 1 अंशापेक्षाही कमी अंतर या दोन्ही ग्रहांमध्ये असणार आहे.

जेव्हा दोन ग्रह पश्चिमेस क्षितिजावर सुमारे 23 अंशावर असतील. शुक्राची प्रत - 4.0 Magnitude असेल, तर गुरु ग्रहाची प्रत -2.1 Magnitude असेल. चंद्राची प्रत -10 आहे. हे दोन्ही ग्रह मीन राशीत (constellation of Pisces) असतील. हे दोन्ही ग्रह ताऱ्यांप्रमाणेच तेजस्वी भासतील. हे नुसत्या डोळ्यांनीही पाहता येतील. दुर्बिणीने पाहिल्यास गुरु ग्रहाचे 4 उपग्रह ही पाहता येतील. 

शुक्र ग्रह अंतग्रह आहे, म्हणजेच पृथ्वीपेक्षा सूर्याच्या जवळ असलेला ग्रह आहे. सूर्याच्या जवळ असलेल्या बुध ग्रहापेक्षा शुक्र ग्रह उष्ण आहे. कारण सूर्यामधून उत्सर्जित होत असलेली ऊर्जा शुक्र ग्रहावरील वातावरणामुळे शोषली जाते आणि ग्रीन हाऊस इफेक्ट तयार होतो. शुक्र ग्रहावरील तापमान हे साधारण 900 डिग्री फॅरेनहाईट (475 डिग्री सेल्सिअस) आहे. एवढ्या उष्ण वातावरणात येणारी प्रत्येक गोष्ट वितळू शकते. शुक्र ग्रहावर अनेक अॅक्टिव्ह व्हॉल्कॅनॉज असू शकतात. गुरू हा बर्हिग्रह आहे. सूर्यापासून तो पाचव्या स्थानावर आहे, जो शुक्र ग्रहापेक्षा कमी उष्ण ग्रह आहे. साधारण 238 डिग्री फॅरेनहाईट (150 डिग्री सेल्सिअस) तापमान असल्याचा अंदाज आहे.

गुरू हा गॅस जाएंट आहे ज्याचा व्यास 88,846 मैल (142,984 किमी), तर दुसरीकडे शुक्राचा व्यास 7,520 मैल (12,103 किमी) आहे. तुलना करायची झाल्यास एक गुरु ग्रहामध्ये 1400 शुक्र ग्रह सामावले जाऊ शकतात. यावरून असा अंदाज घेता येऊ शकतो की गुरु ग्रहापेक्षा शुक्र पृथ्वीच्या जवळ आहे. गुरुचे कोनीय अंतर (Angular Size) 33"3 तर शुक्राचे कोनीय अंतर (Angular Size) हे 12"2 आहे. तुम्ही या दोन्ही ग्रहाचे निरीक्षण दुर्बिण किंवा टेलिस्कोपने करू शकता.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x