मायजियो अॅपचा नवा रेकॉर्ड...

सुरसंचार कंपनी रिलायन्स जियोचे मोबाईल अँप हे अँड्रॉईड प्लॅटफॉर्ममधून सगळ्यात जास्त प्रमाणात डाउनलोड होणारं दुसरं अँप आहे. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की मायाजियो अँप आतापर्यंत १० करोड लोकांनी डाउनलोड केला आहे. त्याचबरोबर मायाजियो हे अँप कमी वेळात इतकी प्रसिद्ध पावणारा पहिला भारतीय अँप आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Aug 11, 2017, 09:56 AM IST
 मायजियो अॅपचा नवा रेकॉर्ड...  title=
गुगल प्लेवर मायाजियो अॅप १० करोड पेक्षा अधिक वेळा डाउनलोड झाला आहे.

नवी दिल्ली: सुरसंचार कंपनी रिलायन्स जियोचे मोबाईल अँप हे अँड्रॉईड प्लॅटफॉर्ममधून सगळ्यात जास्त प्रमाणात डाउनलोड होणारं दुसरं अँप आहे. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की मायाजियो अँप आतापर्यंत १० करोड लोकांनी डाउनलोड केला आहे. त्याचबरोबर मायाजियो हे अँप कमी वेळात इतकी प्रसिद्ध पावणारा पहिला भारतीय अँप आहे. 
रिलायन्स जियोच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीत अअसे म्हटले आहे की, गुगल प्लेवर मायाजियो १० करोड पेक्षा अधिक वेळा डाउनलोड झाला आहे. १० करोड वेळा डाउनलोड झालेला हा दुसरा भारतीय मोबाईल अँप आहे. तसेच सेल्फकेयर अँप काढणारी ही पहिली कंपनी आहे. १० करोडचा आकडा पार केल्याने मायाजियो अँपने हॉटस्टारला देखील मागे टाकले आहे. 
सूत्रांनी सांगितले की, एका वर्षात १० करोड डाउनलोड मिळवणारा मायाजियो हा पहिला भारतीय अँप आहे. एयरटेल, वोडाफोन इंडिया व आयडिया सेल्युलर यांचे सेल्फकेयर अँपचे गूगल प्ले स्टोरवर १ करोड डाउनलोड्स आहेत. 
रिलायन्स जियोचा टीव्ही अँप जियोटीव्हीचे पाच करोड डाउनलोड्स आहेत. तर एयरटेलच्या टीव्ही अँपला ५० लाख डाउनलोडस मिळाले आहेत.